आरोपांमुळे जरांगे व्यथित
मनोज जरांगे पाटील यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे ते व्यथित झालेले पाहायला मिळाले. अजय बारस्कर हा विकत घतलेला व्यक्ती असून तो ट्रपमधील असल्याचा आरोपी जरांगे पाटील यांनी केला. जरांगे म्हणाले, की मी काय वाईट केलं? 57 लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं. याचा फायदा दीड कोटी मराठा समाजाला होणार आहे. मागास वर्ग आयोग गठीत करण्यात आला. 10 टक्के आरक्षण या आंदोलनामुळे मिळालं. ही माझी चूक आहे का? लोकांचे 33/34 तपासायला लावले. माझा मराठा समाज एक केला. यात मी नाव ठेवण्यासारखं केलं काय? जनतेला मायबाप मानायला लागलो.
advertisement
तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागायला पाहिजे का? तू महिलांवर बलात्कार करतो. असे तुझेच गाववाले सांगत आहेत. हा संपूर्ण ट्रॅप आहे. ह्यात सरकार सहभागी असल्याशिवाय घडू शकत नाही. एका महिलेच्या विनयसंभागच प्रकरण दाबलं गेलं. ते उघड करू. नाहीतर तू जरांगेच्या विरोधात बोल, असं धमकावलं गेलं. तो कोण आहे? त्याला आम्ही मोजीतही नाही. ज्याला सोशल मीडियावरही कोणी विचारत नाही, त्याच्या एकएक तासाच्या मुलाखती चॅनेलवर दाखवल्या जातात. हे सर्व सरकारचा हात असल्याशिवाय होऊ शकतं का? अशी शंका जरांगे पाटील यांनी उपस्थित केली.
वाचा - मनोज जरांगेंना इतका राग का आला? वृत्तवाहिन्यांवरच आगपाखड, निवडणूक आयोगालाही आव्हान
संगिता वानखेडेंच्या आरोपाला प्रतिउत्तर
मात्र थेट आरोपांवर जरांगेंनी उत्तर देणं टाळलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात असल्याचा आरोप संगिता वानखेडे यांनी केला होता. याला उत्तर देताना तसल्यांना किंमत द्यायची नाही. समाज महत्वाचा आहे. प्रत्येकाचं उत्तर देत बसलं तर माझं आंदोलन कुठं जाईल. त्यामुळं ते सोडूनच द्या आता यांच्यावर उत्तर देणारच नाही असं जरांगे यांनी म्हंटलं आहे.
