आम्ही मैदानात येतोय...
मनोज जरांगे यांनी निवडणूक जाहीर झाल्यानंतर आपली भूमिका जाहीर केली. यावेळी जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. जरांगे यांनी म्हटले की, आमची मागणी पूर्ण झाली नाही. आरक्षणाबाबत निर्णय घेणं त्यांच्या हातात होतं त्यांनी तो निर्णय घेतला नाही. आता आम्ही मैदानात येत आहोत. मत देणं आमच्या हातात असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले.
advertisement
फडणवीसांचा मराठ्यांचा कार्यक्रम केला...
फडणवीस यांना मराठ्यांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केले. मात्र, देवेंद्र फडणवीसांनी पुरेपुर मराठ्यांचा कार्यक्रम लावला तो यशस्वी पण झाला. शेतीपासून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मराठा समाज एका अरिष्टात अडकला आहे. त्यामुळे या निवडणुकीत आपल्या मतदानाची ताकद दाखवा असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले.
सरकारकडून मराठ्यांचा अपमान...
या सरकारनं जाणूनबुजून आपला अपमान केला आहे असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. त्यांनी आपल्या विरोधात जाऊन ओबीसींमध्ये 17 जातींचा समावेश केला. तुम्ही ठरवायचं आहे आता जात मोठी करायची की तुमचा आमदार मोठा करायचा आहे. त्यांना तुमचे लेकरं मेली तरी काही देणं घेणं नाही. सरकारनं मराठ्यांचे पोरं उन्हात टाकायचं ठरवल आहे. ही शेवटची लाट असेल तुम्हाला मनात आणि मतात दोन्हीतही परिवर्तन करावं लागणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.
समाजाचे हित लक्षात घ्या...
मतदानरुपी ताकद दाखवली नाही तर तुमच्या मुलांचे भवितव्य अंधारात असेल. या निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाकडे भावनिकेतेने पाहू नका, मराठा समाजाचे हित लक्षात घ्यावे असे जरांगे यांनी म्हटले.
