जालना शहरातील सरस्वती भुवन महाविद्यालयात पहिला, तर जे.ई.एस. महाविद्यालयात दुसरा अशी मुक्कामाची ठिकाणे आहेत. यंदा सरस्वती भुवन महाविद्यालयात बांधकाम सुरू असल्याने कल्याणराव घोगडे स्टेडियमवर पालखीचा पहिला मुक्काम होता, तर दुसरा मुक्काम जे.ई.एस. महाविद्यालयात आहे.
Healthy Fruit: फळ एक फायदे अनेक! हृदयासाठी अमृत, शुगर वाढीचं तर टेन्शनच नाही
advertisement
आपल्या हातूनही काहीतरी सेवा घडावी म्हणून जालना शहर आणि रामनगर साखर कारखाना येथील नाभिक समाजाने एकत्र येत वारकऱ्यांची दाढी-कटिंग मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षीपासून त्यांनी ही सेवा देण्यास सुरुवात केली आहे. दिंडीमध्ये साधारणपणे 700 वारकरी सहभागी असतात.
यामध्ये काही महिला वारकरी असतात. जवळपास 500 पुरुष वारकऱ्यांची दाढी आणि कटिंग करण्याची सेवा करण्याचा संकल्प शहरातील नाभिक व्यवसायिकांनी केला आहे.
संत गजानन महाराज यांच्याविषयी असलेली श्रद्धा आणि भावनेतून आम्ही हे काम करत आहोत. यंदाही आमच्या सेवेचे दुसरे वर्ष आहे. यापुढेही अविरतपणे ही सेवा अशीच सुरू राहणार आहे. प्रत्येक जण वारकऱ्यांची, संतांची आपापल्या पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो. आम्ही देखील आमच्या पद्धतीने वारकऱ्यांची दाढी-कटिंग करून ही सेवा करत आहोत, असं व्यावसायिक रमेश राऊत यांनी सांगितलं.