जालना: भारतीय प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारी रोजी दिल्लीत मोठा सोहळा असतो. येथील कर्तव्य पथावर होणाऱ्या मुख्य सोहळ्याचं देशभरातील लोकांना आकर्षण असतं. यंदा महाराष्ट्रातील 16 मच्छीमार दाम्पत्यांना या सोहळ्याचं निमंत्रण केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आलं आहे. यात जालना जिल्ह्यातील मेंढरे दाम्पत्याचाही समावेश आहे. दिल्लीतील सोहळ्यात मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांचं ते प्रतिनिधीत्व करणार आहेत.
advertisement
महाराष्ट्रातून 16 दाम्पत्यांची निवड
दरवर्षी भारतीय प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध घटकातील व्यक्तींना आमंत्रित केले जाते. याच क्रमात यावर्षी केंद्र सरकारच्यावतीने समुद्रात, नदी, तलावात मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या मच्छीमार बांधवांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून निमंत्रीत केलंय. महाराष्ट्रातून 16 दाम्पत्यांना हे निमंत्रण देण्यात आले असून यामध्ये जालना जिल्ह्यातील सोमठाणा (ता. बदनापूर) येथील मेंढरे दांपत्याचा समावेश आहे.
शौर्यनं सर केलं कळसुबाई शिखर, सातव्या वर्षीची कामगिरी पाहून कराल कौतुक, Video
मच्छिमारांचे प्रतिनिधी म्हणून संधी
नवी दिल्ली येथे 26 जानेवारी रोजी कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाचा मुख्य परेड सोहळा होणार आहे. मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या रत्नाकर मुकुंदराव मेंढरे आणि त्यांच्या पत्नी गंगासागर मेंढरे यांना केंद्र सरकारकडून मच्छिमारांचे प्रतिनिधी म्हणून निमंत्रीत करण्यात आले आहे. महाराष्ट्रातून 16 मच्छीमार दाम्पत्यांची या निवड करण्यात आली असून यामध्ये मेंढरे दाम्पत्य एक आहे. तसेच मत्स्यव्यवसाय विकास विभागाचे सहआयुक्त यु.आ. चौगुले यांची नोडल अधिकारी म्हणून निवड करण्यात आली असल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त ना. वि. भादुले यांनी पत्राने कळवले आहे.
रस्त्यावर झोपणाऱ्या गोर गरिबांना मायेची ऊब देणारा ‘ब्लॅंकेट दूत’; 3 वर्षांपासून राबतोय उपक्रम Video
आम्ही आभारी आहोत
केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मत्स्य विभाग यांनी माझ्यासारख्या सामान्य मच्छिमार कुटुंबाला 26 जानेवारी रोजी होणाऱ्या भव्य सोहळ्याचं निमंत्रण पाठवलं. त्यासाठी मी आभार मानतो. मत्स्य विभागाच्या शिफारशीनुसार केंद्राने आमची निवड केली याचा आम्हाला आनंद आहे. प्रत्येक विभागातील वेगवेगळ्या नागरिकांना केंद्र शासनाने निमंत्रित केले आहे. मत्स्य विभागातील राज्यातील 16 दाम्पत्यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रण मिळालं आहे. त्यापैकी आम्ही एक आहोत याचा आम्हाला खूप खूप आनंद असल्याचं रत्नाकर मेंढरे व गंगासागर मेंढरे यांनी सांगितलं.