advertisement

रस्त्यावर झोपणाऱ्या गोर गरिबांना मायेची ऊब देणारा ‘ब्लॅंकेट दूत’; 3 वर्षांपासून राबतोय उपक्रम Video

Last Updated:

रस्त्यावर राहणारे गोर गरीब लोक थंडीपासून बचाव करण्यासाठी जास्त काही करू शकत नाहीत. त्यामुळे पुण्यातील बाळासाहेब मालुसरे यांनी निराधार आणि गरजू लोकांना ब्लॅंकेटचे वाटप केले आहे.

+
News18

News18

प्रतिनिधी, प्राची केदारी
पुणे : सध्या हिवाळा सुरु आहे. त्यामुळे कड्याकाची थंडी पडत आहे. सर्वांना थंडीपासून बचावासाठी शेकोटी, उबदार कपडे यांची मदत घेण्याची गरज भासू लागली आहे. सर्वजण घरामध्ये गरम वातावरण करून राहण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, रस्त्यावर राहणारे गोर गरीब लोक थंडीपासून बचाव करण्यासाठी जास्त काही करू शकत नाहीत. त्यामुळे पुण्यातील मंडई सांस्कृतिक कट्ट्याचे अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे यांनी निराधार आणि गरजू लोकांना ब्लॅंकेटचे वाटप केले आहे. ते गेली तीन ते चार वर्ष झालं हा उपक्रम राबवत आहेत. परंतु हा उपक्रम राबवण्यामागचा त्यांचा नेमका उद्देश काय आहे हे जाणून घेऊया.
advertisement
किती ब्लॅंकेटचे केले वाटप
पुण्यातील बाळासाहेब मालुसरे यांनी रस्त्यावर राहणाऱ्या गोर गरिबांना या वर्षी साधारणपणे 300 ब्लॅंकेटचे वाटप केले आहे. ते दरवर्षी थंडीपासून बचाव करण्यासाठी ब्लॅंकेटचे वाटप करतात. यामध्ये लहानापासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वांना हे ब्लॅंकेट वाटले जातात.
advertisement
काय आहे उपक्रम सुरु करण्याचा उद्देश?
जी लोक मजुरी करतात बाहेर झोपतात त्यांना अंगावर गरम कपडे भेटत नाहीत. आपण घरात राहतो त्यामुळे आपल्याला थंडी जाणवत नाही. परंतु या लोकांना रस्त्यांनी जाताना बघत असतो तेव्हा असं वाटतं की या लोकांनसाठी काही तरी करावं. हे ब्लॅंकेट वाटताना त्यांना ही छान वाटत. तसेच स्वारगेट, मंडई,शिवाजीनगर, काँग्रेस हाऊस समोरील जागा, दांडेकर पूल अशा विविध भागामध्ये याचे वाटप करत असतो, अशी माहिती मंडई सांस्कृतिक कट्ट्याचे अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे यांनी सांगितली.
advertisement
जिल्हा परिषद शाळेमध्ये फुलली सुंदर परसबाग; विद्यार्थ्यांना दिले जातायत शेतीचे धडे PHOTOS
या उपक्रमामुळे अनेकांना ऊब मिळत आहे. सध्या जर आपण पाहिलं तर थंडीचं प्रमाण हे देखील वाढत आहे. आणि रस्त्याच्या कडेला राहणाऱ्याची संख्या पहिली तर ती देखील मोठ्या प्रमाणात आहे.या लोकांनसाठी अनेकांनी पुढे येत असे विविध उपक्रम हे राबवले पाहिजे. यामुळे अनेकांना या मधून मदतचे हात मिळतील.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
रस्त्यावर झोपणाऱ्या गोर गरिबांना मायेची ऊब देणारा ‘ब्लॅंकेट दूत’; 3 वर्षांपासून राबतोय उपक्रम Video
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement