TRENDING:

900 रुपये खात्यावर जमा होणार, फक्त करा हे काम, तुम्हाला या योजनेबद्दल माहितीय का?

Last Updated:

Sanjay Gandhi Niradhar Yojana: संजय गांधी निराधार योजनेचे पैसे लवकरच थेट बँक खात्यात जमा होणार आहेत. त्यासाठी लाभर्थ्यांना एक काम करावं लागणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना: राज्यातील वयोवृद्ध व निराधार व्यक्तींसाठी संजय गांधी निराधार योजना सुरू केली आहे. या अंतर्गत लाभार्थ्याला दरमहा 900 रुपये दिले जातात. लाभर्थ्यांना जीवनावश्यक वस्तू व सेवांची खरेदी करण्यासाठी दर महिन्याला ही रक्कम मिळणे आवश्यक असते. परंतु, बँकेकडून लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे वर्ग करण्याच्या प्रक्रियेला विलंब होत होता. त्यामुळे लाभार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आता ही रक्कम थेट डीबीटी द्वारे बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे.
Sanjay Gandhi niraadhaar Yojana 
Sanjay Gandhi niraadhaar Yojana 
advertisement

लाभार्थ्यांना वेळेवर पैसे मिळवण्यासाठी बँक खात्याला आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक करून घ्यावा लागणार आहे. तरच संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेचे पैसे बँक खात्यात जमा होतील. त्यामुळे सर्व लाभार्थींना संबंधित रक्कम थेट बँकेत जमा होण्यासाठी आधार लिंक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपल्या शहरातील संजय गांधी कार्यालयात कागदपत्रांसह भेटावे लागेल, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

advertisement

Mhada Lottery 2024: हक्काच्या घराचं स्वप्न साकार करण्याची संधी, ‘म्हाडा’ अर्जासाठी मुदतवाढ

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हे गाव लई न्यारं! ज्ञानोबा ते शिवबा, गावानं जपलाय ऐतिहासिक वारसा, तुम्ही पाहिलं का? Video
सर्व पहा

निराधार व्यक्तींना शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून महिन्याअखेर ठराविक मानधन दिले जाते. जालना शहर तालुक्यात संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवानिवृत्त वेतन योजना या लाभार्थ्यांना डी.बी.टी. मार्फत त्यांचे खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहे. जालना शहरातील लाभार्थ्यांनी विहीत मुदतीत आवश्यक ती कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे. जे लाभार्थी सदर कागदपत्र या कार्यालयास सादर करणार नाही. त्यांचा लाभ बंद झाल्यास त्यासाठी लाभार्थी स्वत: सर्वस्वी जबाबदार राहील. याची नोंद घ्यावी, अशी माहिती तहसिलदार जालना छाया पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
900 रुपये खात्यावर जमा होणार, फक्त करा हे काम, तुम्हाला या योजनेबद्दल माहितीय का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल