Mhada Lottery 2024: हक्काच्या घराचं स्वप्न साकार करण्याची संधी, ‘म्हाडा’ अर्जासाठी मुदतवाढ
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Nikita Tiwari
Last Updated:
Mhada Lottery 2024: आपल्या हक्काचं घर साकार करण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ऑनलाईन अर्ज करण्यास 6 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिलीये.
मुंबई: हक्काच्या घराचं स्वप्न साकार करण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे 2264 सदनिकांच्या विक्रीसाठी जाहीर सोडतीकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आलीये. त्यामुळे आता इच्छुकांना 24 डिसेंबरऐवजी 6 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत, अशी माहिती मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिलीये.
कोकण मंडळातील म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 11 ऑक्टोबर 2024 रोजी सुरू झाली. अर्ज भरण्यासाठी 24 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. परंतु, आता यामध्ये वाढ करण्यात आली असून 6 जानेवारी रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया बंद करण्यात येणार आहे. तर 7 जानेवारी रोजी रात्री 11.59 पर्यंत अर्जदारांना अनामत रक्कम भरता येईल. तसेच 7 जानेवारी रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेत RTGS/NEFT करून देखील अनामत रकमेचा भरणा करता येईल.
advertisement
दरम्यान, सोडतीसाठी पात्र झालेल्या उमेदवारांची यादी 20 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर 22 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्जदारांना प्रारुप यादीवर आपल्या दावे व हरकती नोंदवण्यात येतील. 24 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता सोडतीत सहभागी अर्जांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
advertisement
कोकण मंडळाने 2264 घरांसह 12,626 घरांची विक्री करण्याची तयारी सुरू केलीये. यातील 12,626 घरे ही ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्वानुसार देण्यात येणार आहेत. या योजनेत विरारसह इतर भागातील तयार घरांचा समावेश आहे. यासाठी म्हाडाकडून विशेष मोहीम चावलण्यात आली होती. परंतु, मोठ्या प्रयत्नानंतरही कोकण मंडळातील घराची विक्री झालेली नाही. त्यामुळे पुन्हा मुदतवाढ देण्यात आल्याचं सांगितलं जातंय.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 24, 2024 9:42 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mhada Lottery 2024: हक्काच्या घराचं स्वप्न साकार करण्याची संधी, ‘म्हाडा’ अर्जासाठी मुदतवाढ