TRENDING:

जामखेड नर्तिका प्रकरणात नवा ट्विस्ट, भाजपननंतर आता राष्ट्रवादी कनेक्शन देखील समोर

Last Updated:

जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटील आत्महत्या प्रकरणात आता नवा ट्वि्स्ट समोर आला असून राजकीय आरोप–प्रत्यारोपांना उधाण आलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
साहेबराव कोकणे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

अहिल्यानगर : जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटील हिने खर्डा रोडवरील एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या धक्कादायक प्रकरणाने स्थानिक परिसरासोबतच राजकीय वर्तुळातही खळबळ माजली आहे. दिपालीने का आत्महत्या केली, यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट नाही. मात्र दुर्गा गायकवाड यांच्या तक्रारीनंतर या प्रकरणात आरोपी संदीप गायकवाड याला पोलिसांनी अटक केली आहे.

जामखेडमधील एका कलाकेंद्रात दिपाली पाटील… नृत्यांगना म्हणून काम करत होती. तपेश्वर भागात मैत्रिणीसोबत राहणारी ही तरुणी बाजारात जाऊन येते म्हणत घरातून बाहेर पडली, पण घरी परतलीच नाही.

advertisement

बराच वेळ संपर्क न झाल्यानंतर मैत्रिणीची धाकधूक वाढली. चौकशी केल्यावर रिक्षाचालकाने दिपालीला खर्डा रोडवरील लॉजवर सोडल्याची माहिती दिली. लॉजवर पोहोचताच दिपालीने फोन न उचलल्याने कर्मचारी आणि मैत्रिणींनी दरवाजा उघडला आणि दिपालीने गळफास घेतल्याचं निदर्शनास आले. त्यानंतर तातडीने याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.

भाजपच्या संदीप गायकवाडला अटक

या प्रकरणात दुर्गा गायकवाड यांच्या फिर्यादीवरून भाजपाचा संदीप गायकवाड याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर राजकीय आरोप–प्रत्यारोपांना उधाण आलं आहे. भाजपाचं म्हणणं संदीप गायकवाड भाजपाचा कार्यकर्ता नाही. तर राष्ट्रवादी (शरद पवार गट)चा दावा तो सध्या भाजपाचाच कार्यकर्ता आहे. संदीप गायकवाड पूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाशी जोडलेले होते.

advertisement

दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची राळ

मात्र 2025 च्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी भाजपाच्या तिकिटावर उभ्या राहिल्या होत्य. त्या वेळी भाजपाच्या नेत्यांनी त्यांच्या प्रचारालाही सहभाग घेतला होता, तरीही सद्य घडामोडींमध्ये दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची राळ उठली आहे. या प्रकरणाचा तपास पुढील काही दिवसांत कोणते नवे वळण घेणार… याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

advertisement

सखोल चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी

जामखेड नगरपरिषद निवडणूक प्रचारात रोहित पवार यांनी भाजपवर टीका करताना नगरपरिषद निवडणुकीत भाजपने गुंड प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिली असल्याचे वारंवार म्हटलं होतं. त्यातच आता त्यांच्याच उमेदवाराच्या पतीने दबाव टाकल्याने एका नर्तिकेना आत्महत्या केल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. रोहित पवारांनी ट्विट करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता राष्ट्रवादी कनेक्शन समोर आल्याने या प्रकरणा नवा ट्विस्ट समोर आला आहे.

advertisement

हे ही वाचा :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बापाचा आधार बनू शकत नाही, त्रास देऊ नका! 'एल्डर लाईन'ची मन खिन्न करणारी आकडेवारी
सर्व पहा

दिपाली पाटील प्रकरणी कलाकेंद्राच्या मालकाचा धक्कादायक खुलासा, म्हणाले तीन महिन्यापूर्वी नर्तिकेने कलाकेंद्र सोडलं होतं

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जामखेड नर्तिका प्रकरणात नवा ट्विस्ट, भाजपननंतर आता राष्ट्रवादी कनेक्शन देखील समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल