उतार वयात बापाचा आधार बनू शकत नाही, निदान त्रास तरी देऊ नका! 'एल्डर लाईन'ची मन खिन्न करणारी आकडेवारी
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
गेल्या काही वर्षांपासून प्रॉपर्टीच्या वादावरून ज्येष्ठ नागरिकांना त्रास देण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
पुणे : गेल्या काही वर्षांपासून प्रॉपर्टीच्या वादावरून ज्येष्ठ नागरिकांना त्रास देण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच वयोमानानुसार उद्भवणाऱ्या शारीरिक अडचणी, एकटेपणा, नातेसंबंधांतील दुरावा, मुलांकडून होणारा तिरस्कार अशा प्रसंगांना अनेक ज्येष्ठ नागरिकांना सामोरं जावं लागतं. या सगळ्या अनुभवांमुळे त्यांच्या आयुष्यात एकाकीपणा आणि नैराश्य वाढू लागते. आपल्या अडचणी कोणाला सांगायच्या? हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहतो. याच समस्या दूर करण्यासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत एक हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत 10 कोटी वृद्ध नागरिकांनी यावरती तक्रार केली आहे. तर 2025 मध्ये महाराष्ट्रातील 4 लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळाला आहे.
अशी घेऊ शकता मदत?
अनेक वयस्कर नागरिकांच्या आयुष्यात एकटेपणा आणि नैराश्याचं प्रमाण मोठं आहे. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी त्यांच्या आसपास कोणी नसतं, त्यामुळे मानसिक ताण वाढतो. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठांना भावनिक आधार देण्यासाठी सरकारने 2021 सालापासून ज्येष्ठ नागरिकांसाठी एल्डर लाईन 14567 हा हेल्पलाइन नंबर उपलब्ध करून दिला आहे. यावर कॉल केल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या सगळ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जातो.
advertisement
Agricultre News : आर्थिक गणित बिघडणार, शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, खतांच्या दरात मोठी दरवाढ, Video
ही सेवा आज 10 कोटींपेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी कार्यरत आहे. एल्डर लाईन आलेल्या कॉलनुसार मदत उपलब्ध करून दिली जाते. ही सेवा वर्षाच्या बाराही महिने सुरू असते. आरोग्य, कायदे, भावनिक आधार, संपत्ती, वारसा संबंधित सल्ला, वृद्धाश्रम मनोरंजन तसेच त्यांच्या सर्व प्रश्नांवर मार्गदर्शन दिले जाते.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 06, 2025 8:14 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
उतार वयात बापाचा आधार बनू शकत नाही, निदान त्रास तरी देऊ नका! 'एल्डर लाईन'ची मन खिन्न करणारी आकडेवारी

