VIDEO : चित्यासारखी स्फूर्ती...रोहितची फिल्डिंग पाहून सगळेच शॉक, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत बसलं
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत रोहित शर्माने चित्यासारखी स्फूर्ती दाखवून बंदूकीतल्या गोळीप्रमाणे वेगाने धावणाऱ्या बॉलवर झटप मारून खतरनाक फिल्डींग केली आहे.
India vs South Africa 3rd odi : विशाखापट्टणच्या मैदानावर भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यात रोमांचक सामना सुरू आहे. या सामन्यात एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत रोहित शर्माने चित्यासारखी स्फूर्ती दाखवून बंदूकीतल्या गोळीप्रमाणे वेगाने धावणाऱ्या बॉलवर झटप मारून खतरनाक फिल्डींग केली आहे. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
खरं तर ही घटना 38 व्या ओव्हर दरम्यान घडली आहे. या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर डेवाल्ड ब्राविसने एक कट शॉट वेगाने खेळला होता. हा बॉल थेट रोहित शर्माच्या दिशेने कॅचसाठी गेला होता.यावेळी रोहितने चित्याच्या वेगाने डाईव्ह मारून कॅच घेण्याचा प्रयत्न केला. पण या दरम्यान त्याच्या हातून बॉल निसटला होता. पण जरी कॅच सुटला असला तरी त्याने 3 अतिरीक्त धावा रोखल्या होत्या. त्यामुळे ज्याप्रमाणे रोहित शर्माने डाईव्ह मारून बॉल रोखला होता, ते पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता.
advertisement
Rohit Sharma has been breathing absolute fire on the field these days 😭🔥
Listen to the huge roar from the crowd after that effort 🔥pic.twitter.com/8LSUzJS0fz
— Kusha Sharma (@Kushacritic) December 6, 2025
पण कॅच ड्रॉप झाल्यानंतर तो निराश झाला होता, पण प्रेक्षकांनी त्याच्या फिल्डिंगचे कौतुक केले होते.या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. खरं तर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने मैदानात जबरदस्त पुनरागमन केलं आहे. विशेष म्हणजे या दोन खेळाडूंनी नुसती फलंदाजीत नाही तर फिल्डिंग आणि कॅच घेताना जबरदस्त कामगिरी केली आहे.त्यामुळे या गोष्टी पाहून आश्चर्य वाटतं.
advertisement
रोहित शर्माचा मोठा रेकॉर्ड
view commentsतिसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्माने 73 बॉलमध्ये 75 धावांची खेळी केली आहे. या खेळी दरम्यान त्याने सात चौकार आणि तीन षटकार लगावले आहेत. यासोबत रोहित शर्माने एक मोठा टप्पा गाठला. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20,000 धावा पूर्ण केल्या. या सामन्यापूर्वी रोहित 20,000 धावांचा टप्पा गाठण्यापासून 27 धावा दूर होता,जो त्याने सहज साध्य केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20,000 धावा करणारा रोहित हा फक्त चौथा भारतीय फलंदाज आहे. रोहितपूर्वी फक्त सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि विराट कोहली यांनीच हे यश मिळवले होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 06, 2025 8:05 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : चित्यासारखी स्फूर्ती...रोहितची फिल्डिंग पाहून सगळेच शॉक, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत बसलं


