अशी घेऊ शकता मदत?
अनेक वयस्कर नागरिकांच्या आयुष्यात एकटेपणा आणि नैराश्याचं प्रमाण मोठं आहे. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी त्यांच्या आसपास कोणी नसतं, त्यामुळे मानसिक ताण वाढतो. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठांना भावनिक आधार देण्यासाठी सरकारने 2021 सालापासून ज्येष्ठ नागरिकांसाठी एल्डर लाईन 14567 हा हेल्पलाइन नंबर उपलब्ध करून दिला आहे. यावर कॉल केल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या सगळ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जातो.
advertisement
Agricultre News : आर्थिक गणित बिघडणार, शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, खतांच्या दरात मोठी दरवाढ, Video
ही सेवा आज 10 कोटींपेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी कार्यरत आहे. एल्डर लाईन आलेल्या कॉलनुसार मदत उपलब्ध करून दिली जाते. ही सेवा वर्षाच्या बाराही महिने सुरू असते. आरोग्य, कायदे, भावनिक आधार, संपत्ती, वारसा संबंधित सल्ला, वृद्धाश्रम मनोरंजन तसेच त्यांच्या सर्व प्रश्नांवर मार्गदर्शन दिले जाते.





