सोसायटीत मॅटर झालं अन् ज्याच्याकडे सांभाळायला दिली त्यानेच 8,00,00,000 रुपयांचं कांड केलं; समिती कोमात, पुण्यातील घटना PHOTOS
- Published by:Sachin S
Last Updated:
पुण्यातील एकता को-ऑपरेटिव्ह नावाची एक सोसायटी आहे. या सोसासटीमध्ये नवीन 33 सदस्य आहे. ज्यांनी 2005 मध्ये शेअर्स खरेदी केले होते. पण, त्यानंतर या ३३ सदस्यांचा नव्याने वाद उद्भवला. (अभिजीत पोते, प्रतिनिधी)
पुणे आणि कल्याण- डोंबिवली परिसरात सोसायटीमधले वाद हे काही नवीन नाही. या ना त्या मुद्यावरून सोसायट्यांमध्ये वाद होतच राहतात. कधी कधी सोसायटीचे वाद हे इतकी विकोपाला जातात की, पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचतात. पण, पुण्यातील एका सोसायटीचं प३करण थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पोहोचलं. हे प्रकरण होतं, तब्बल 8 कोटी लाचेचं. इतक्या मोठ्या प्रमाणात लाच शासकीय काय खासगी क्षेत्रातही कुणी मागितली नसेल.
advertisement
त्याचं झालं असं की, पुण्यातील एकता को-ऑपरेटिव्ह नावाची एक सोसायटी आहे. या सोसासटीमध्ये नवीन 33 सदस्य आहे. ज्यांनी 2005 मध्ये शेअर्स खरेदी केले होते. पण, त्यानंतर या ३३ सदस्यांचा नव्याने वाद उद्भवला. हा वाद इतका विकोपाला गेला ही सोसायटी लिक्विडेशनमध्ये गेली होती. लिक्विडेशन म्हणजे, आता ही सहकारी सोसायटी आता कायदेशीररित्या बंद झाली किंवा समिती विसर्जित झाली होती.
advertisement
सोसायटी समिती विसर्जित झाल्यानंतर सोसायटीचं सगळं काम समितीकडून काढून घेतलं जातं आणि हे नियमाप्रमाणे ते सरकार किंवा निबंधकांनी नियुक्त केलेल्या एका अधिकाऱ्याकडे ज्याला लिक्विडेटर म्हणतात, त्याच्याकडे सोपवलं होतं. हा लिक्विडेटर सोसायटीची मालमत्ता ताब्यात घेतो, कर्ज फेडणे, सोसायटीचा रोजचा खर्च करण्याचे अधिकार त्याच्याकडे असतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


