डिसेंबर 2025 ची 'धुरंधर' सुरुवात! लवकरच थिएटरमध्ये रिलीज होणार या चार नव्या फिल्म
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
December 2025 Movies : 'डिसेंबर 2025'ची 'धुरंधर' सुरुवात झाली असून लवकरच आणखी चार नवीन चित्रपट रिलीज होणार आहेत.
'डिसेंबर 2025' हा महिना बॉलिवूडसाठी खूपच एंटरटेनिंग असणार आहे. वर्षाच्या शेवटी थिएटरमध्ये जबरदस्त चित्रपट धडकणार आहेत. यात विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या, वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांचा समावेश आहे. रोमान्स, कॉमेडी, हॉरर, थ्रील, ड्रामा अशा सर्व गोष्टी या महिन्यात रिलीज होणाऱ्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळतील.
advertisement
लहान मुलं, तरुण मंडळी, वयस्कर मंडळी अशा प्रत्येक वयोगटातील मंडळींना डिसेंबर महिन्यात रिलीज होणारे चित्रपट पाहायला मिळणार आहेत. लेकीच्या जन्मानंतर रणबीर सिंहने 'धुरंधर' या चित्रपटाच्या माध्यमातून जोरदार कमबॅक केलं आहे. आदित्य धर दिग्दर्शित या स्पाय अॅक्शन, ड्रामामध्ये संजय दत्त, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना, सारा अर्जुन आणि राकेश बेदी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
advertisement
advertisement
किस किस को प्यार करूं 2 (Kis Kisko Pyaar Karoon 2) : कपिल शर्माचा 'किस किस को प्यार करूं' हा चित्रपट 2015 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता 12 डिसेंबर 2025 रोजी या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तीन पत्नींच्या अवतीभोवती फिरणारं कपिल शर्माचं पात्र आहे. या चित्रपटात त्रिधा चौधरी, पारुल गुलाटी, आयशा खान, हीरा वरीना, असरानी, मनजोत सिंह, अखिलेंद्र मिश्रा आणि विपिन शर्मा हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
advertisement
दुर्लभ प्रसाद की दुसरी शादी (Durlabh Prasad Ki Dusri Shadi) : संजय मिश्रा आणि महिमा चौधरी यांचा 'दुर्लभ प्रसाद की दुसरी शादी' हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची चांगलीच क्रेझ आहे. आपल्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नाची प्रतीक्षा करणाऱ्या एका मुलाची गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. पण कथानकात एक जबरदस्त ट्विस्ट आहे. इमोशन आणि ह्यूमर यांचं मिश्रण असणारी ही फिल्म आहे. येत्या 19 डिसेंबरला हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होत आहे.
advertisement
तू मेरी मैं तेरा में तेरा तू मेरी (Tu Meri Main Tera Main Tera Tu Meri) : कार्कित आर्यन आणि अनन्या पांडे यांचा 'तू मेरी मैं तेरा में तेरा तू मेरी' हा एक अनोखा, रंगीत रोमँटिक, कॉमेडी चित्रपट आहे. टायटल मोठं असलं तरी या चित्रपटाचा हल्का-फुल्का जॉनर आहे. 25 डिसेंबर 2025 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
advertisement
इक्कीस (Ikkis) : श्रीराम राघवन दिग्दर्शित 'इक्कीस' हा चित्रपट येत्या 25 डिसेंबरला नाताळात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. परमवीर चक्र विजेता अरुण खेत्रपाल यांचा हा बायोग्राफिकल ड्रामा आहे. 'इक्कीस' या चित्रपटात अगस्त्य नंदा महत्त्वाच्या भूमिकेत आहे. धर्मेंद्र यांचा हा शेवटचा चित्रपट आहे. जयदीप अहलावतदेखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.


