चायनीज राईस आता बस्स! तुम्ही खाल्ला का पगार राईस, फक्त 70 रुपयांपासून! Video

Last Updated:

स्ट्रीट फूड म्हटलं की चायनीजचे वेगवेगळे फ्लेवर्स, मसालेदार राईस आणि परवडणारे कॉम्बो आठवतात. त्यातलंच एक नवं पण झपाट्यानं लोकप्रिय होत चाललेलं ठिकाण म्हणजे अंधेरीतील दोसती किचन.

+
फक्त

फक्त ₹70 पासून चायनीज राईसचे भन्नाट पर्याय

मुंबई: स्ट्रीट फूड म्हटलं की चायनीजचे वेगवेगळे फ्लेवर्स, मसालेदार राईस आणि परवडणारे कॉम्बो आठवतात. त्यातलंच एक नवं पण झपाट्यानं लोकप्रिय होत चाललेलं ठिकाण म्हणजे अंधेरीतील दोसती किचन. येथील खास गोष्ट म्हणजे फक्त 70 रुपयांपासून सुरू होणारे चायनीज आणि राईसचे अनेक प्रकार, ज्यामध्ये पगार राईस, पनीर चिली राईस, दोस्ती स्पेशल राईस, व्हेज–नॉनव्हेज राईस असे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. चायनीज प्रेमींसाठी मसाला ड्राय लॉलीपॉप, बटर गार्लिक चिकन आणि व्हेज राईसचेही विविध प्रकार येथे दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहेत.
दोसती किचनची सर्वात जास्त चर्चेत असलेली डिश म्हणजे पगार राईस. महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसांत खिशाला परवडेल अशा दरात भरपूर क्वांटिटीमध्ये चायनीज खाण्याचा अनुभव देणारी ही डिश तरुणांच्या विशेष पसंतीस उतरते आहे. याठिकाणी बनणारे सर्व पदार्थ पूर्णपणे सनफ्लावर तेलामध्ये तयार केले जात असून, ताज्या आणि फ्रेश साहित्याचा वापर केला जातो, हीसुद्धा ग्राहकांना आवडण्यामागची एक मोठी कारणं आहेत.
advertisement
फक्त कमी किमती नव्हेत तर क्वालिटी, फ्रेशनेस आणि चव यांचा ताळमेळ साधत हे ठिकाण लवकरच अंधेरी परिसरातील फूडीजसाठी एक बेस्ट स्टॉप बनत आहे. विविध चायनीज राईसपासून व्हेज–नॉनव्हेज कॉम्बोपर्यंत सर्व काही आपल्या बजेटमध्ये मिळत असल्याने दोस्ती किचनकडे सध्या खवय्यांची चांगलीच गर्दी दिसत आहे. ही दोस्ती किचन अंधेरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मेट्रो स्टेशन आणि गुंदवली मेट्रो स्टेशन पासून फक्त दोन मिनिटांच्या अंतरावर आहे. 
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
चायनीज राईस आता बस्स! तुम्ही खाल्ला का पगार राईस, फक्त 70 रुपयांपासून! Video
Next Article
advertisement
Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement