'आज तुझा पहिला वाढदिवस, पण...' पोलीस बापाचं लेकीसाठी शेवटचं काळीज धस्स करणारं स्टेट्स, PHOTOS
- Published by:Sachin S
Last Updated:
आपल्या लेकीच्या वाढदिवशी निखिल रनदिवे यांनी व्हॉट्सअपवर भावपूर्ण श्रद्धांजली पोस्ट केली होती. त्यानंतर त्यानंतर रणदिवे हे बेपत्ता झाले आहे. (सुमित सोनवणे, प्रतिनिधी)
पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलीस निरीक्षकाच्या जाचाला कंटाळून एका पोलीस हवालदाराने टोकाचं पाऊल उचलल्याची शक्यता वर्तवली जात आहे. धक्कादायक म्हणजे, आपल्या लेकीच्या वाढदिवशी निखिल रनदिवे यांनी व्हॉट्सअपवर भावपूर्ण श्रद्धांजली पोस्ट केली होती. त्यानंतर त्यानंतर रणदिवे हे बेपत्ता झाले आहे. या घटनेमुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे
advertisement
दौंड तालुक्यातील यवतचे पोलीस स्टेशनमध्ये हवालदार पदावर निखील रणदिवे कार्यरत होते. त्यांनी यवत स्टेशनचे निरीक्षक नारायण देशमुख यांच्या त्रास दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. यवत पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या केडगाव येथील पोलीस चौकीमध्ये निखिल रणदिवे हे पोलीस नाईक पदावर कार्यरत होते. मागील वर्षभरापासून त्यांची बदली झाली नव्हती, त्यामुळे ते त्रस्त होते.
advertisement
advertisement
५ डिसेंबर रोजी रणदिवे यांनी व्हॉट्सअपवर एक पोस्ट लिहिली. यात यवत पोलीस स्टेशनचे निरीक्षक नारायण देशमुख हेच मागील १ वर्षांपासून सतत त्रास देत आहेत. माझ्या नाईलाज आहे. मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेत आहे. अशी पोस्ट टाकून रणदिवे बेपत्ता झाले आहे. रणदिवे हे स्टेटस ठेवल्यापासून त्यांचा मोबाईल बंद असून ते अद्यापपर्यंत मिळून आला नाही. यामुळे पुणे जिल्ह्याच्या पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
advertisement
advertisement
advertisement


