70 च्या दशकातील ही अभिनेत्री, नवरा उठण्याआधी करायची मेकअप, लेकीने सांगितला तो किस्सा
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bollywood Actress : 70 च्या दशकातील एक लोकप्रिय अभिनेत्री नवरा उठण्याआधी मेकअप करायची. कारण ऐकूण सोनाक्षी सिन्हाने दिलेली प्रतिक्रिया सध्या लक्ष वेधून घेत आहे.
Bollywood Actress : प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी करिअर पिकवर असताना क्रिकेटर मन्सूर अली खान पटौदी यांच्याशी लग्न केलं होतं. दोघेही त्या काळातील सर्वात चर्चित जोडप्यांपैकी एक होते आणि त्यांची प्रेमकहाणी सर्वांनाच ठाऊक होती. अभिनेत्रीला नीट समजून घेतल्यानंतर मन्सूर अली खान यांनी त्यांना प्रपोज केले. मात्र, शर्मिला टागोर यांनी लग्नासाठी होकार देण्यापूर्वी एक अट घातली होती, जी अनेकांना माहिती आहे. 70 च्या दशकातील या अभिनेत्रीने सांगितले होते की जर त्यांनी पुढच्या सामन्यात तीन षटकार मारले, तर त्या लग्नासाठी होकार देतील आणि तसेच घडले. आता नुकतंच शर्मिला टागोर यांच्याबद्दल एक नवी माहिती समोर आली आहे. सोहा अली खानने सांगितले की त्यांच्या आई शर्मिला आपल्या पतीच्या उठण्यापूर्वी उठून चेहऱ्यावर हलका मेकअप लावत असत.
शर्मिला टागोर नवरा उठण्यापूर्वी मेकअप का करत असे?
सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये सोनाक्षी सिन्हा सहभागी झाली होती. या दरम्यान तिने प्रेम आणि नातेसंबंधांविषयी खुलेपणाने चर्चा केली. सैफ अली खानची बहीण सोहा म्हणाली,"मी कुणाल खेमूसमोर मेकअपशिवाय खूपच कम्फर्टेबल असते. पण माझ्या आईने मला एकदा सांगितले होते की जेव्हा त्यांचे लग्न झाले तेव्हा त्या पप्पांच्या आधी उठून हलका-फुलका मेकअप करायच्या." सोहाने पुढे हे देखील सांगितले की शर्मिला असे का करत असत. ती म्हणाली,"मेकअप केल्यानंतर त्या पुन्हा झोपायच्या, कारण त्यांना वाटायचे की त्या शर्मिला टागोर आहेत आणि उठल्यानंतर पप्पा त्यांनाच पहिले पाहावेत."
advertisement
सोनाक्षी सिन्हाची प्रतिक्रिया व्हायरल
सोनाक्षी सिन्हा म्हणाली,"तुम्हाला खरंच वाटतं का की गोष्टी अशा प्रकारे घडतात? आकर्षणासाठी प्रेम आणि समर्पण आवश्यक असतं. मी खरंच या गोष्टींकडे फारसं लक्ष देत नाही. हे फक्त लुक्सवर अवलंबून नसतं. मला नेहमी जाणवतं की मी कशामुळे आकर्षित होते. व्यक्ती जसा आहे तसाच, आणि तो मला कसं फील करून देतो… ते महत्त्वाचं आहे."
advertisement
सोनाक्षी सिन्हाने सांगितली पती जहीरची खासियत
view commentsबॉलिवूड अभिनेत्री पुढे म्हणाली,"तो असा माणूस आहे, ज्याने मला नेहमी आत्मविश्वास दिला आहे. मी कशीही दिसत असले तरी. तो माझे सर्वात वाईट फोटो काढतो आणि मी कारण विचारलं तर तो म्हणतो… त्या क्षणी तू मला खूप सुंदर दिसतेस".
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 06, 2025 9:24 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
70 च्या दशकातील ही अभिनेत्री, नवरा उठण्याआधी करायची मेकअप, लेकीने सांगितला तो किस्सा


