Special Raillway: विमानाचा 'मेगाब्लॉक' प्रवाशांच्या मदतीला धावून आला गरिबांचा 'रथ', विशेष ट्रेनचं संपूर्ण वेळापत्रक

Last Updated:

Central Railway To Run Special Trains: इंडिगो एअर लाईन्सच्या विस्कळीत झालेल्या वेळापत्रकाचा थेट परिणाम देशभरातील हवाई प्रवासावर झाला आहे. याचा गैरफायदा घेत इतर विमान कंपन्यांनी तिकीट दरात अव्वाच्या सव्वा वाढ केली होती. गरजेच्या वेळी प्रवाशांना आरक्षित तिकिट मिळत नसल्यामुळे आता प्रवाशांची चांगलीच कोंडी झालेली आहे. प्रवाशांची झालेली कोंडी लक्षात घेता आता मध्य रेल्वेने देशामध्ये रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Special Raillway: विमानाचा 'मेगाब्लॉक' प्रवाशांच्या मदतीला धावून आला गरिबांचा 'रथ', विशेष ट्रेनचं संपूर्ण वेळापत्रक
Special Raillway: विमानाचा 'मेगाब्लॉक' प्रवाशांच्या मदतीला धावून आला गरिबांचा 'रथ', विशेष ट्रेनचं संपूर्ण वेळापत्रक
इंडिगो एअर लाईन्सच्या विस्कळीत झालेल्या वेळापत्रकाचा थेट परिणाम देशभरातील हवाई प्रवासावर झाला आहे. याचा गैरफायदा घेत इतर विमान कंपन्यांनी तिकीट दरात अव्वाच्या सव्वा वाढ केली होती. प्रवाशांची वाढलेली मागणी आणि मर्यादित उड्डाणांमुळे अनेक मार्गांवरील भाडे गगनाला भिडले आहेत. अशातच आता अनेक प्रवाश्यांनी आता रेल्वे प्रवासाचा मार्ग निवडला आहे. गरजेच्या वेळी प्रवाशांना आरक्षित तिकिट मिळत नसल्यामुळे आता प्रवाशांची चांगलीच कोंडी झालेली आहे. प्रवाशांची झालेली कोंडी लक्षात घेता आता मध्य रेल्वेने देशामध्ये रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांसाठी त्यांच्या सोयीप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वे सेवा पुरवल्या जाणार आहेत. यामध्ये, मुंबई, लखनऊ, हजरत निजामुद्दीन (दिल्ली), पुणे, बंगळुरू, नागपूर, हैदराबाद या ठिकाणाचा समावेश आहे. या स्थानकांवर रेल्वेकडून विशेष रेल्वे चालवली जाणार आहे. या विशेष गाड्यांमध्ये प्रथम वातानुकूलित, वातानुकूलित, द्वितीय वातानुकूलित, तृतीय वातानुकूलित, शयनयान आणि जनरल डब्बा अशा सर्व वर्गांचा समावेश आहे. प्रवाशांच्या वाढलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वेने विविध सण आणि हिवाळी सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष मागणीवर आधारित 14 रेल्वे गाड्यांचे नियोजन करून त्यांची घोषणा केली आहे.
advertisement
मुंबई सीएसएमटी ते नागपूर विशेष गाडी 7 डिसेंबर रोजी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून दुपारी 03:30 वाजता सुटेल. लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव विशेष गाडी ७ डिसेंबर रोजी एलटीटी येथून सकाळी 11:10 वाजता सुटेल. लोकमान्य टिळक टर्मिनस ते हैदराबाद विशेष गाडी 7 डिसेंबर रोजी एलटीटी येथून सायंकाळी 05:20 वाजता सुटेल. पुणे ते हजरत निजामुद्दीन (दिल्ली) विशेष गाडी 7 डिसेंबर रोजी पुणे येथून रात्री 08: 20 वाजता सुटेल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. प्रवाशांच्या आवश्यकतेनुसार मध्य रेल्वेकडून आणखी विशेष गाड्यांचे नियोजन केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Special Raillway: विमानाचा 'मेगाब्लॉक' प्रवाशांच्या मदतीला धावून आला गरिबांचा 'रथ', विशेष ट्रेनचं संपूर्ण वेळापत्रक
Next Article
advertisement
Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement