Skin Care : मुरुमांचे डाग घालवण्यासाठी हा उपाय नक्की करुन पाहा, चेहरा दिसेल फ्रेश

Last Updated:

त्वचा अंतर्बाह्य निरोगी ठेवण्यासाठीचे अनेक पर्याय आयुर्वेदात आहेत. प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर विवेक जोशी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर अशाच एका उपायाची माहिती देणारी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी त्वचेच्या समस्यांवर मंजिष्ठा या औषधाचा पर्याय सुचवला आहे. 

News18
News18
मुंबई : इच्छा असूनही अनेकदा चेहरा हवा तसा फ्रेश दिसत नाही. काही वेळा मुरुमांचे डाग राहतात. चेहऱ्यावर कशाची अ‍ॅलर्जी येऊ शकते. मुरुमांच्या खुणा, काळे डाग आणि त्वचेचा असमान रंग यामुळे अनेकदा चेहऱ्याची चमक कमी होते.
चेहऱ्यावरच्या विविध समस्यांसाठी आयुर्वेदात काही नैसर्गिक उपाय सुचवले आहेत. त्वचा अंतर्बाह्य निरोगी ठेवण्यासाठीचे अनेक पर्याय आयुर्वेदात आहेत. प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर विवेक जोशी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर अशाच एका उपायाची माहिती देणारी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी त्वचेच्या समस्यांवर मंजिष्ठा या औषधाचा पर्याय सुचवला आहे.
मंजिष्ठा हे रक्त शुद्ध करणारे नैसर्गिकरित्या प्रभावी औषध  आहे. ते शरीराला आतून स्वच्छ करते आणि चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक बाहेर काढते. नियमित वापरामुळे मुरुमांचे डाग, रंगद्रव्य कमी होऊ शकते आणि त्वचेचा रंगही उजळू शकतो.
advertisement
मंजिष्ठा प्यायल्यानं रक्त शुद्ध होतं आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. याचे परिणाम थेट चेहऱ्यावर दिसतात. काढा बनवण्यासाठी एक टेबलस्पून मंजिष्ठा पावडर आणि दोन कप पाणी लागेल. मंजिष्ठा पावडर पाण्यात अर्धी होईपर्यंत उकळवा. दिवसातून एकदा गाळून घ्या आणि प्या. यामुळे शरीर विषमुक्त होतं, त्वचेचं आरोग्य आतून सुधारतं आणि चमक वाढते.
advertisement
चेहऱ्यावर मंजिष्ठा फेसपॅक लावू शकता. यामुळे हळूहळू काळे डाग, मुरुमांचे डाग आणि पिगमेंटेशन कमी होईल. हा पॅक बनवण्यासाठी एक टेबलस्पून मंजिष्ठा पावडर आणि थोडा मध किंवा दही लागेल.
या सामग्रीची एक गुळगुळीत पेस्ट बनवा. चेहऱ्यावर पंधरा मिनिटं तसंच ठेवा, नंतर स्वच्छ पाण्यानं धुवा. या फेसपॅकमुळे त्वचा उजळते आणि त्वचेचा पोत सुधारतो.
advertisement
मंजिष्ठा त्वचेसाठी फायदेशीर आहे. पण, तुम्हाला काही ऍलर्जी असेल तर प्रथम पॅच टेस्ट करा. गर्भवती महिलांनी किंवा ज्यांना आजार आहेत त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच मंजिष्ठा घ्यावी. नैसर्गिक घटक हळूहळू काम करतात, म्हणून ते नियमितपणे वापरा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Care : मुरुमांचे डाग घालवण्यासाठी हा उपाय नक्की करुन पाहा, चेहरा दिसेल फ्रेश
Next Article
advertisement
Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement