Thane Traffic News: ठाणेकरांनो रविवारी प्रवास करण्यापूर्वी ही बातमी वाचा! घोडबंदर रोडवरील वाहतुकीत मोठे बदल
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. वाहतूक कोंडीमुळे कायमच त्रस्त असणाऱ्या ठाणेकरांना येत्या रविवारी अर्थात रविवारच्या दिवशी 7 डिसेंबर 2025 रोजी सुद्धा ट्रॅफिकला तोंड द्यावे लागणार आहे.
ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. वाहतूक कोंडीमुळे कायमच त्रस्त असणाऱ्या ठाणेकरांना येत्या रविवारी अर्थात रविवारच्या दिवशी 7 डिसेंबर 2025 रोजी सुद्धा ट्रॅफिकला तोंड द्यावे लागणार आहे. घोडबंदर मार्गावर मिरा भाईंदर महापालिकेकडून फाऊंटन हॉटेल ते काजुपाडा या भागात रविवारी रस्ते दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी घोडबंदर मार्गावर 24 तासांसाठी अवजड वाहनांना प्रवेश बंदी लागू केली आहे. तर हलक्या वाहन चालकांना विरुद्ध दिशेने वाहतूक करून प्रवास करावा लागणार आहे. हा वाहतूक बदल वाहन चालकांना संपूर्ण दिवस म्हणजेच रविवारी लागू करावे लागणार आहे.
ठाणे घोडबंदर राज्य मार्ग 84 या मार्गावर गायमुख नीराकेंद्र, काजूपाडा ते फाऊंटन हॉटेलपर्यंत ग्राऊटींगचे आणि मास्टिक असफाल्टचे काम हाती घेण्यात येत आहे. त्यामुळे उद्या रविवारी 7 डिसेंबर मध्यरात्री 12:01 ते 11:59 वाजेपर्यंत काम हाती घेण्यात आले आहे. वाहतुकीत बदल झाल्याची माहिती, ठाणे शहर वाहतुक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी याबाबतची अधिसुचना जारी केली आहे. मात्र पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडोर, ऑक्सिजन गॅस वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना वाहतुकीच्या बदलाचे नियम लागू होणार नाहीत. ठाणे शहर वाहतूक शाखेकडून पर्यायी मार्गांची माहितीही देण्यात आली.
advertisement
मुंबई आणि ठाण्यातून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या सर्व अवजड वाहनांना माजिवडा वाय जंक्शन आणि कापुरबावडी चौकाजवळ प्रवेशबंदी करण्यात येणार आहे. या मार्गावरील अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुरफाटा मार्गे वाहतुक करतील. मुंबई- ठाणेकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड अवजड वाहने ही कापुरबावडी जंक्शन जवळुन उजवी कडे वळण घेऊन कशेळी, अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील. मुंब्रा- कळवाकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारे सर्व जड अवजड वाहनांना खारेगाव टोल नाका येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.
advertisement
नाशिककडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारे सर्व जड अवजड वाहनांना मानकोली नाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. नाशिक कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड अवजड वाहनांना मानकोली ब्रिज खालुन, उजवीकडे वळण घेऊन अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जाता येणार आहे, असा पर्यायी मार्ग असेल. तर, सर्व हलक्या वाहनांसाठी गायमुख घाटात ठाणे घोडबंदर वाहिनीवर काम चालू असताना ठाणेकडून घोडबंदरच्या दिशेने जाणारी हलक्या वाहने गायमुख चौकी पासून घोडबंदर ठाणे वाहिनीपर्यंत एकाच मार्गाने जाऊन पुढे फाउंटन हॉटेल समोरील कट मधून इच्छित स्थळी जातील.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
December 06, 2025 8:57 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Thane Traffic News: ठाणेकरांनो रविवारी प्रवास करण्यापूर्वी ही बातमी वाचा! घोडबंदर रोडवरील वाहतुकीत मोठे बदल


