Ghee Benefits : पचनाच्या समस्यांवर घरगुती उत्तर, तूप करेल पोट स्वच्छ, चेहरा करेल ग्लो
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
तुपामधे अ, ड, ई आणि के जीवनसत्त्वं तसंच फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि लोह यांसारखे पोषक घटक असतात. हे सर्व घटक शरीरासाठी फायदेशीर असतात. तूप नियमित खाण्यानं पचनसंस्था मजबूत राहते आणि हाडं निरोगी राहतात.
मुंबई : रोजच्या जेवणात तुम्ही तूप वापरता का ? काही जण फोडणीसाठीही तुपाचा वापर करतात. काही जण दिवसाची सुरुवात गरम पाण्यानं करतात. तर काही जण कोमट पाण्यात लिंबू, मध घालून पाणी पितात.
गरम भात, वरण आणि त्यावर तूप हा अनेकांसाठीचा आवडता बेत. तूप आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. तुपामधे अ, ड, ई आणि के जीवनसत्त्वं तसंच फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि लोह यांसारखे पोषक घटक असतात. हे सर्व घटक शरीरासाठी फायदेशीर असतात. तूप नियमित खाण्यानं पचनसंस्था मजबूत राहते आणि हाडं निरोगी राहतात.
advertisement
सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात तूप मिसळून पिणं हे शरीरासाठी खूपच पोषक ठरतं.
पचनसंस्था मजबूत होते - पोटाच्या समस्या वारंवार त्रास देत असतील तर दररोज सकाळी एक चमचा तूप कोमट पाण्यात मिसळून पिणं सुरुवात करा. यामुळे आतडी स्वच्छ होतात आणि पचनसंस्था मजबूत होते, ज्यामुळे पचन खूप सोपं होतं.
आम्लपित्त आणि बद्धकोष्ठता - आम्लपित्तचा त्रास होत असेल तर तूप उपयुक्त आहे. कोमट पाण्यात तूप मिसळून प्यायल्यानं आम्लपित्त आणि बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.
advertisement
सांधेदुखीपासून आराम - वयानुसार किंवा हिवाळ्यात सांधेदुखी ही एक मोठी समस्या आहे. यापासून आराम मिळवण्यासाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात तूप मिसळून पिऊ शकता. यामुळे सांधे मजबूत होतील आणि सांध्यांना चांगलं वंगण मिळेल.
चेहऱ्यावरील डाग कमी होतात - रोज रिकाम्या पोटी पाण्यात तूप टाकून प्यायल्यानं शरीरातले विषारी पदार्थ बाहेर पडतात. हे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे चेहऱ्यावरील डाग हळूहळू साफ होऊ लागतात आणि त्वचा उजळते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 06, 2025 6:27 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Ghee Benefits : पचनाच्या समस्यांवर घरगुती उत्तर, तूप करेल पोट स्वच्छ, चेहरा करेल ग्लो


