अरे देवा! नवीन वर्षात मूलांक 8 असणाऱ्या लोकांचं वाढणार टेंशन, पण 'एक' गोष्ट ठरणार गेम चेंजर, बदलणार नशीब
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, किंवा 26 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 8 असतो. मूलांक 8 चा स्वामी ग्रह शनि आहे, जो न्याय, कठोर परिश्रम, अनुशासन आणि धैर्याचे प्रतीक मानला जातो.
advertisement
2026 या वर्षाचा एकूण मूलांक 1 आहे, ज्याचा स्वामी ग्रह सूर्य आहे. शनि आणि सूर्य हे पिता-पुत्र असूनही एकमेकांचे विरोधी ग्रह मानले जातात. त्यामुळे मूलांक 8 असलेल्यांसाठी 2026 हे वर्ष संघर्ष, बदल आणि आत्म-विश्वासाची मागणी करणारे असेल. या वर्षात यश मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या कामात सातत्य आणि नेतृत्वाची भावना आणावी लागेल.
advertisement
करिअर आणि कार्यक्षेत्र: करिअरच्या दृष्टीने हे वर्ष कठोर परिश्रमाची मागणी करेल. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल, पण ते सहज मिळणार नाही. तुमच्या कामाचे श्रेय दुसऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे निराशा वाटू शकते. तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा; वर्षाच्या शेवटी परिस्थिती सुधारेल आणि मोठे यश मिळेल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


