सोलापूर - महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 साली मुंबई येथे महापरिनिर्वाण झाले. त्यानंतर त्यांच्या अस्थी कलशांचे महाराष्ट्रातील तीनच ठिकाणी दर्शन होते, मुंबई येथील चैत्यभूमी, नागपूर येथील दीक्षाभूमी यानंतर सोलापूर शहरातील प्रेरणाभूमी आहे. ही प्रेरणाभूमी आजही आंबेडकर अनुयायींना प्रेरणा देण्याचं काम करत आहे. या संदर्भात अधिक माहिती सामाजिक कार्यकर्ते आतिश बनसोडे यांनी दिली.



