कल्याण पश्चिमेतील रामबाग खडक शाखेचे ज्येष्ठ शिवसैनिक राजेंद्र शिंगरे यांचे रोहन शिंगरे यांचा 15 ऑगस्टला मृत्यू झाला. रोहन शिंगरे हा राजेंद्र शिंगरे यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. रोहन शिंगरे हा वाशीला कामाला जात होता. यावेळी कल्याण शीळ मार्गावर गॅलेक्सी फर्निचर ते पिंपळेश्वर हॉटेल दरम्यान प्रवास करताना त्याची गाडी एका खड्ड्यात आदळली होती.यामुळे तो जमीनीवर कोसळला होता.याच दरम्यान मागून येणारा ट्रक त्याच्या हातावरून गेला. तसेच ट्रकच्या टायरमध्ये त्याचा हात देखील फसल्याने त्याला दुरपर्यंत फरफटत नेले होतं,अशी माहिती प्रत्यक्षदर्शनी प्रवासी आणी नागरिकांनी दिली होती.
advertisement
या घटनेनंतर तत्काळ स्थानिकांनी रोहन शिंगरेला मानपाडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर सानपाडा येथील रुग्णालयात त्याला अॅडमीट केलं होता. ही अपघाताची घटना 23 जुलैला घडली होती.तिथून तब्बल 21 दिवस रोहन शिंगरे मृत्यूशी लढा देत होता. पण 15 ऑगस्टला त्याची प्राणज्योत माळवली होती.त्यामुळे त्याची मृ्त्यूशी झूंज अपयशी ठरली.
दरम्यान रोहन शिंगरे हा कल्याण रामबाग येथील मधील ज्येष्ठ शिवसैनिक राजेंद्र शिंगरे यांचा एकुलता एक मुलगा होता.त्यामुळे रोहनच्या निधनाने शिंगरे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त होतोय.