मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण रामबाग परिसरात राहणार रोहन शिंगरे हा वाशीला कामाला जात होता. कल्याण शीळ मार्गावरून गॅलेक्सी फर्निचर ते पिंपळेश्वर हॉटेल दरम्यान प्रवार करताना त्याची गाडी एका खड्ड्यात आदळली होती. या खड्ड्यामुळे तो रस्त्यावर कोसलळा. त्याचवेळी मागून येणारा ट्रक त्याच्या हातावरून गेला. तसेच हा ट्रक नुसता हातावरून गेला नाही तर ट्रकच्या टायरमध्ये त्याचा हात देखील फसला. यामुळे तो दुरपर्यंत फरफटत गेला होता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शनी प्रवासी आणी नागरिकांनी दिली होती.
advertisement
या घटनेनंतर लगेचच रोहन शिंगरेला मानपाडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर सानपाडा येथील रुग्णालयात त्याला अॅडमीट केलं होता. 23 जुलैला ही अपघाताची घटना घडली होती. त्यानंतर 15 ऑगस्टला त्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे तब्बल 21 दिवस रोहन शिंगरे मृत्यूशी झूंज देत होता. पण अखेर त्याची प्राणज्योत माळवली आहे.
दरम्यान रोहन शिंगरे हा कल्याण रामबाग येथील मधील ज्येष्ठ शिवसैनिक राजेंद्र शिंगरे यांचा एकुलता एक मुलगा होता.त्यामुळे रोहनच्या निधनाने शिंगरे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
तसेच कल्याण डोंबिवली हा शिवसैनिकांचा बालेकिल्ला मानला जातो. या बालेकिल्ल्यात प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एक शिवसैनिकाच्याच लेकाचा खड्ड्यामुळे बळी गेल्याने प्रचंड टीका होतेय.
रोहनला मानपाडा रोडवरील गजानन हॉस्पिलटलध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण या हॉस्पिटलमध्ये अपूऱ्या सोयीसुविधा असल्या कारणाने त्याला सानपाड्याला हलवण्यात आले होते. यावेळी रोहनच्या डाव्या हाताचं मास बाहेर आलं होतं आणि नसा तुटल्या होत्या.त्यामुळे त्याचा हात कापण्याचा निर्णय घेण्यात आला होता. डावा हात काढल्यानंतर त्याचा किडनीवर इफेक्ट झाला.त्याच क्रिएटीन वाढत नव्हत, श्वासोश्चवासही मिळत नव्हता. पण उपचाराने तो बरा देखील होता. त्यानंतर श्वासोच्छवास पुन्हा कमी पडला आणि बॉडीने हळूहळु एक बॉर्डी पार्ट डॅमेज करायला सूरूवात केली आणि त्याचा मृ्त्यू झाला, असे माजी महापौर वैजंती घोलप यांनी सांगितले.