मध्य रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; या मार्गावर लोकल-एक्सप्रेस गाड्यांना होणार परिणाम
कल्याण आणि आजूबाजूच्या शहरांना जोडणारा वालधूनी पूल आणि परिसरात दररोज वाहतूक कोंडी होते. याचा त्रास सर्वांनाच होत असल्याचा आता हे स्पष्ट झाले आहे. वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांसाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी वाहतूक शाखेचे एसीपी किरण बालवडकर यांची भेट घेतली. वाहतूक समस्या त्वरीत दूर करण्याची मागणी एनसीपीच्या पदाधिकार्यांनी पोलिसांकडे केली. ही वाहतूक कोंडी रस्त्यावरील खड्ड्यामुळे होत असल्याने यासंदर्भात केडीएमसीला पत्र व्यवहार केला आहे. खड्डे बुजले की, वाहतूक समस्या संपेल असे एसीपी बालवडकर यांनी स्पष्ट केले आहे. या खड्ड्यांचा आणि वाहतूक कोंडीचाही त्रास वाहतूक पोलीसांनाही होत असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.
advertisement
नवरात्रीत उपाशीपोटी फळे खाताय? आरोग्यासाठी फायदा की तोटा? जाणून घ्या सविस्तर, Video
कल्याण शहरामधील महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या वालधूनी पूल परिसरात कायमच ट्रॅफिक पाहायला मिळते. कल्याण स्थानकाकडे, रामबाग, सिंडिकेट, कल्याण पूर्व, बिर्ला कॉलेज या ठिकाणी जाण्यासाठी दररोज वालधूनी पूल परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळते. त्याचा त्रास प्रवासी, वाहन चालकांसह नागरिकांना होतो. या प्रकरणी शहरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कल्याण वाहतूक विभागाचे एसीपी किरण बालवडकर यांची भेट घेतली. त्यांना निवेदन देत वाहतूक कोंडीवर योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी केली. वाहतूक कोंडीमुळे शालेय विद्यार्थी, नोकरवर्ग, रुग्णवाहिका आणि सामान्य माणसांना फटका बसत आहे. काही मिनिटांच्या प्रवासाला तासनतास लागत आहे.
बाजारातील भेसळयुक्त कुट्टुचे पीठ आरोग्यासाठी घातक! नवरात्रीचा घरीच करा तयार..
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वाहतूक पोलिसांना आंदोलनाचाच थेट इशारा दिला आहे. जर, लवकरात लवकर वाहतूक कोंडीवर तोडगा काढला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून देण्यात आला आहे. वाहतूक कोंडी रस्त्यावरील खड्ड्यामुळे होत असल्याचे एसीपी बालवडकर यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितले. शिवाय यासंदर्भात केडीएमसीला पत्र व्यवहार केला आहे. खड्डे बुजले की, वाहतूक समस्या संपेल असं ही ते म्हणाले. वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनीही वाहतूक कोंडीसाठी रस्त्यावरील खड्ड्यांनाच जबाबदार ठरवले. त्यामुळे आत्ता महापालिका रस्त्यावरील खड्डे कधी भरणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कोल्हापुरातील संशोधकांचा जगात डंका! 20 जणांची थेट स्टॅनफोर्डने घेतली दखल
गणेशोत्सवापासून रस्त्यावरील खड्डे भरले जाणार असल्याची माहिती केडीएमसी देतेय. पण अद्यापही ते काम झालेलं नाही. गणेशोत्सव झाला, आता नवरात्रोत्सव सुरू आहे, काही दिवसांत दसरा येईल. पण अद्यापही रस्त्यावरील खड्डे बुजलेले नाहीत. आणखी किती दिवस कल्याण- डोंबिवलीकरांना खड्ड्यातून प्रवासांना करावा लागणार ? हे पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे. केडीएमसी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी आणखी कोणत्या सणाची वाट पाहते ? असा सवाल सध्या नागरिक विचारत आहेत.