TRENDING:

कराड उत्तर विधानसभा निवडणूक 2024 :  बाळासाहेब पाटील सहाव्यांदा आमदार होण्यासाठी रिंगणात; भोसले-घोरपडेंचा जोर भाजपसाठी इतिहास घडवणार का?

Last Updated:

Maharashtra Assembly Election 2024, Karad North Assembly Constituency : विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील राष्ट्रवादी पक्षाचे असून ते शरदचंद्र पवार गटात आहेत. या निवडतेणुकी ते महाविकास आघाडीच्या तिकिटावर लढणार आहेत. त्यांचा प्रमुख विरोधक भाजपकडून आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सातारा :  जिल्ह्यातील एक महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे कराड उत्तर. कराड उत्तर हा सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी एक आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ऊस पट्ट्यातला हा महत्त्वाचा मतदारसंघ. राष्ट्रवादी काँग्रेसचं इथे वर्चस्व आहे. महाराष्ट्रातील ऊस कारखानदारी, शिक्षण, आणि राजकारण यांत कराड उत्तरचं स्थान महत्त्वाचं आहे. विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील राष्ट्रवादी पक्षाचे असून ते शरदचंद्र पवार गटात आहेत. या निवडतेणुकी ते महाविकास आघाडीच्या तिकिटावर लढणार आहेत. त्यांचा प्रमुख विरोधक भाजपकडून आहे, ज्यामुळे यंदा कराड उत्तरमध्ये तगडे आव्हान उभे आहे. मनोज पाटील यांना महायुतीने उमेदवारी दिली आहे.
कराड उत्तर विधानसभा
कराड उत्तर विधानसभा
advertisement

कराड उत्तर मतदारसंघ इतिहास

कराड उत्तर मतदारसंघात सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील पुसेसावळी महसूल मंडळ, कोरेगांव तालुक्यातील वाठार किरोली, रहिमतपूर ही महसूल मंडळे आणि रहिमतपूर नगरपालिका, सातारा तालुक्यातील अपशिंगे आणि नागठाणे ही महसूल मंडळे आणि कराड तालुक्यातील इंदोली, मसूर, उंब्रज आणि कोपर्डे हवेली ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो.

करा़ड उत्तर हा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा मतदारसंघ. आधी काँग्रेस आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. पी. डी पाटील आणि त्यानंतर त्यांचे पुत्र श्यामराव उर्फ बाळासाहेब पाटील या मतदारसंघातून सलगपणे निवडून येत आहेत. सहाव्यांदा आमदार होण्यासाठी ते महाविकास आघाडीकडून रिंगणात आहेत. 1999 पासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व पाटील यांच्याकडे आहे. तत्पूर्वी त्यांचे वडील पांडुरंग उर्फ पी.डी. पाटील यांनीही कराडचं प्रतिनिधित्व केलं होतं.

advertisement

2019 विधानसभा निवडणूक निकाल

बाळासाहेब पाटील – राष्ट्रवादी – 100,509

मनोज घोरपडे – अपक्ष - 51,294

गेल्या निवडणुकीत अपक्ष म्हणून लढलेले मनोज घोरपडे या वेळी भाजपच्या तिकिटावर रिंगणात आहेत. महायुतीचे ते अधिकृत उमेदवार आहेत. बाळासाहेब पाटील शरद पवार यांचे समर्थक आहेत आणि महाविकास आघाडीकडून रिंगणात आहेत.

2024 लोकसभा निवडणुकीत काय झालं?

advertisement

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ सातारा लोकसभा मतदारसंघात येतो. साताऱ्यात या लोकसभा निवडणुकीच्या वेळी हाय व्होल्टेज उमेदवार होते. महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे विरुद्ध महायुतीचे उदयनराजे भोसले यांच्यात लढत झाली. भाजपचे उदयनराजे यांनी निवडणुकीत बाजी मारली. त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शशिकांत शिंदे यांचा उदयनराजे यांना 5 लाख 71 हजार 134 मते मिळाली. त्यांनी शिंदे यांचा 32771 मतांच्या फरकाने पराभव केला. सातार लोकसभेवर यंदा पहिल्यांदाच भाजपाचा खासदार झाला आहे. त्यामुळे साताऱ्यातील भाजपाच्या वाट्याला येणाऱ्या विधानसभा मतदारसंघात विजय प्राप्त करण्याची जबाबदारी पक्षाने उदयनराजेंकडे दिली असल्याच्या बातम्या आहेत.

advertisement

सातारा जिल्ह्यातील विद्यमान आमदार आणि त्यांची भूमिका

  1. सातारा जावळी- शिवेंद्रराजे भोसले- भाजप
  2. वाई - मकरंद पाटील – राष्ट्रवादी
  3. फलटण- दीपक चव्हाण – राष्ट्रवादी शरदचंद्र पवार
  4. माण खटाव- जयकुमार गोरे- भाजप
  5. कोरेगाव- महेश शिंदे- शिवसेना
  6. कराड उत्तर - बाळासाहेब पाटील – राष्ट्रवादी शरदचंद्र पवार
  7. कराड दक्षिण - पृथ्विराज चव्हाण - कॉंग्रेस
  8. advertisement

  9. पाटण - शंभुराजे देसाई – शिवसेना
  10. टॉप व्हिडीओज

    सर्व पहा
    अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
    सर्व पहा

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कराड उत्तर विधानसभा निवडणूक 2024 :  बाळासाहेब पाटील सहाव्यांदा आमदार होण्यासाठी रिंगणात; भोसले-घोरपडेंचा जोर भाजपसाठी इतिहास घडवणार का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल