कराड उत्तरेत शरद पवार गटाचे सलग पाच वेळा जिंकणाऱ्या आमदार बाळासाहेब पाटलांचा धक्कादायक पराभव झाला आहे.तसेट पाटण मतदार संघातून शिवसेनेच्या शंभूराज देसाई यांनी विजयाची हॅट्रिक मारली आहे.
कराड हे महाराष्ट्राला मुख्यमंत्री देणारं शहर. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं गाव. कृष्णा-कोयना यांच्या प्रीतिमसंगमावर वसलेलं हे शहर राज्याच्या शुगर बेल्टमधलं महत्त्वाचं शहर. ऊस कारखानदारीबरोबर इथे शिक्षण क्षेत्रही बहरत आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात पहिल्या दोन निवडणुकांचा अपवाद वगळता सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण विधानसभेत काँग्रेसशिवाय इतर कोणत्याही पक्षाचा आजवर विजय झालेला नाही. पण यंदा मात्र या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपने कडवं आव्हान निर्माण केलं आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी याची झलक दिसली.
advertisement