TRENDING:

Balasaheb Thorat: 'मला संग्राम बापू भंडारे मधून बापू काढावा लागेल' हिंदुत्ववादी कीर्तनकाराचा थोरातांना इशारा

Last Updated:

'माझी गाडी फोडायची तर फोडा मात्र कुठल्याही धर्म प्रचारकावर हल्ला केला तर मला संग्राम बापू भंडारे...'

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
संगमनेर: आम्हाला नथुराम व्हावं लागेल असं वक्तव्य करणाऱ्या कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांचा आणखी व्हिडीओ समोर आला आहे. भंडारे यांनी पुन्हा एकदा काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना आता 'मला संग्राम बापू भंडारे मधला बापू काढून टाकावा लागेल आणि मला संग्राम भंडारे व्हावे लागेल' असा इशारा दिला आहे.
News18
News18
advertisement

काही दिवसांपूर्वी संगमनेरमधील घुलेवाडी इथं कीर्तन सुरू असताना कीर्तनकार भंडारे यांनी हिंदुत्वाबद्दल बोलायला सुरुवात केली तेव्हा स्थानिकांनी जोरदार आक्षेप घेतला आणि  महाराजांनी अभंगावर बोलावं, असं म्हणत मागणी केली. पण हे प्रकरण आता राजकीय वादात पेटलं आहे. कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी पुन्हा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना इशारा दिला आहे.  संग्राम भंडारे यांचा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

advertisement

भंडारे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांचा व्हिडीओ शेअर केला आहे. 'थोरात यांनी हल्ल्याचे समर्थन केल्यानं आळंदी मधील महाराजांच्या गाड्या फोडण्याचे लोक बोलू लागले आहे.  माझी गाडी फोडायची तर फोडा मात्र कुठल्याही धर्म प्रचारकावर हल्ला केला तर मला संग्राम बापू भंडारे मधला बापू काढून टाकावा लागेल आणि मला संग्राम भंडारे व्हावे लागेल' असं आता या महाराजाचंं म्हणणं आहे.

advertisement

काय म्हणाले होते बाळासाहेब थोरात? 

'मी काही महात्मा गांधी नाही अन् होऊ शकत नाही. परंतु असा कुणी नथुराम गोडसे समोर आल्यावर, विचार अन् तत्वासाठी आनंदानं बलिदान स्वीकारील. घुलेवाडीतील कीर्तनात घडलं काय, त्यावर त्यांना कुणी थांबवलं नाही. परंतु त्यांनी मूळ अभंग सोडून, ज्यावेळेस दुसऱ्या विषयांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. स्थानिक राजकारणावर बोलायले लागले, राज्यघटनेतील मुलभूत तत्त्वावर नकारात्मक बोलायला लागेल, तेव्हा एका युवकाने उभं राहून आक्षेप घेतला. महाराज तुम्ही अभंगावर बोला, एवढचं त्या युवकानं म्हटलं होतं. कीर्तनात काय काय वक्तव्य केले महाराजांनी, तर ते तथाकथित महाराज आहे. खऱ्या वारकारी संप्रदायाच्या परंपरेत काही राजकारण करण्यासाठी घुसले आहेत, त्यातला तो प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया थोरातांनी दिली होती.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Balasaheb Thorat: 'मला संग्राम बापू भंडारे मधून बापू काढावा लागेल' हिंदुत्ववादी कीर्तनकाराचा थोरातांना इशारा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल