संग्राम बापू भंडारे काय म्हणाले?
पाकिस्तानने २७ लोकांना धर्म विचारून गोळ्या घालून ठार मारले. त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानचे शेकडो दहशतवादी ठार मारले. पाकिस्तानचे शेकडो दहशतवादी मेल्यानंतरही ते आपल्याशी जर क्रिकेट खेळायला तयार असतील, तर मग आपण का मागे सरायचे?
पाकिस्तानचे खेळाडू बॉल घेऊन येणार असतील तर आपण बॅट घेऊन तयार असले पाहिजे. आपण जर त्यांच्यासोबत क्रिकेटचा सामना खेळलो नाही तर मोदी पाकिस्तानला घाबरले असे पाकिस्तानमध्ये आणि भारताच्या काही भागांत बॅनर लागतील. भारत पाकिस्तानला घाबरू शकतो का कधी?
advertisement
खेळ म्हटले की हारजीत ठरलेली आहे. पण माझी तमाम हिंदू बांधवांना विनंती आहे की भारत पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडेही युद्ध म्हणून पाहिले पाहिजे. म्हणून सामना तर झालाच पाहिजे. परंतु नरेंद्र मोदी यांना माझी विनंती असेल की खेळाच्या आधी आणि खेळ झाल्यानंतर जी हस्तांदोलनाची परंपरा आहे ती आज होता कामा नये. त्यांच्यात आणि आपल्यात बॅट आणि बॉलचं युद्ध होऊ द्यात. हस्तांदोलन जर टाळता आले तर नक्की प्रयत्न करा. पण सामना झालाच पाहिजे. जिंकू किंवा हरू पण खेळू ना... पळून थोडी जाणार आपण... पाकिस्तानसोबत जीवाचे रान करून आपले खेळाडू खेळतील, याचा आम्हाला आत्मविश्वास आहे. आपण त्यांना शुभेच्छा देऊ आणि पाकिस्तनाची आज पुन्हा जिरवू... जय श्रीराम