शुभम आणि आशितोष हे दोघे गोव्यावरून परत येताना 50 हजार रुपयांची दारू घेऊन महाराष्ट्रात आले होते. भोगवतीमार्गे हे दोघे दारूची बेकायदेशीररित्या वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानंतर शनिवारी पोलिसांनी नवीन वाशी नाका येथे सापळा रचला आणि दोघांनाही अटक केली. या दोघांकडून पोलिसांनी 50 हजारांची दारू आणि 7 लाखांची कार असा एकूण साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
advertisement
शुभम साळुंखे आणि आशितोष साळुंखे या दोन्ही भावांविरोधात कोल्हापूरच्या करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारमध्ये लपवून आणलेली दारू पलूसमधल्या बार चालकांना विकण्याचा शुभम आणि आशितोषचा प्लान होता, पण पहिल्याच प्रयत्नामध्ये हे दोघं पोलिसांच्या जाळ्यात अडकले. शुभम आणि आशितोष यांच्यातल्या एकाचे वडील महसूल खात्यात वरिष्ठ अधिकारी असल्याची माहितीही समोर आली आहे.