मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर शहरातील गल्ली नंबर 11 येथे दोन तरुणांवर दिवसाढवळ्या चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात आकाश नामदेव नलवडे हा गंभीर तर शहारुख मुजावर हा किरकोळ जखमी झाला आहे.या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे आणि नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
advertisement
खरं तर आकाश नलवडे आणि शहारुख मुजावर हे दुपारी दोनच्या सुमारास गल्ली नंबर 11 मधील एका पानटपरीसमोर उभे असताना पुंडलिक गाडीवडर हा मोटारसायकलवर तेथे आले.यावेळी किरकोळ वाद झाला आणि अचानक आरोपींनी जवळ असणारे चाकूने हल्ला चढवला.हल्ल्यात आकाश नलवडे यांच्या दोन्ही मांडीवर तसेच हाताच्या बोटावर वार करण्यात आले असून तो गंभीर जखमी झाला आहे. तर शहारुख मुजावर याच्या मांडीवर झालेल्या वारात तो किरकोळ जखमी झाला होता. दोन्ही गटात झालेल्या वादाची ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सूरू केला आहे.तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी आरोपींचा शोध सूरू केला आहे.या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
