छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य आणि इंद्रजित सावंतांना धमकी दिल्या प्रकरणी कोरटकरवर 25 फेब्रुवारीला गुन्हा दाखल झाला होता, त्यानंतर 25 मार्चला त्याला अटक करण्यात आली होती. दरम्यान कोरटकरची सुटका करण्यासाठी बंदी असलेल्या काळ्या फिल्मिंग असलेल्या कारचा वापर करण्यात आला. कोरटकरला सोडण्यासाठी कोल्हापूर पोलिसांकडून MH-08-AN-6776 या फिल्मींग कारचा वापर करण्यात आला. त्यामुळे कोल्हापूरकरांच्या मनामध्ये संतापाची लाट निर्माण झाली. इतकेच नव्हे तर या संपूर्ण प्रकाराविरोधात कोल्हापूर पोलीस अधीक्षक आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. प्रजासत्ताक सेवा संस्थेचे दिलीप देसाई यांनी या संदर्भातील नाराजी मेलने व्यक्त करत संबंधित कारचा फोटोही निर्दशनास आणून दिला आहे.
advertisement
विमानतळावर सोडण्यासाठी वापरलेल्या गाडीच्या मालकाविरोधातही तक्रार
पाच दिवस पोलीस कोठडी आणि 12 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर त्याला जामीन मिळाला आहे . शिवप्रेमींचा रोष असल्यानं त्याला पोलीस बंदोबस्त पुरवत विमानतळावर पोहचवण्यात आलं.. दरम्यान कोरटकरला विमानतळावर सोडण्यासाठी वापरलेल्या गाडीच्या मालकाविरोधातही तक्रार करण्यात आलीय. फिल्मिंग असलेली गाडी वापरल्यानं ही तक्रार करण्यात आलीय. प्रजासत्ताक सामाजिक संस्थेनं याबाबत चौकशीची मागणी केलीय.
रात्री उशिरा विमानाने नागपूरला येण्याची शक्यता
अवमान आणि इंद्रजित सावंत यांना धमकी प्रकरणी कोरटकर वर 25 फेब्रुवारीला गुन्हा दाखल झाला होता.त्यानंतर 25 मार्चला त्याला अटक करण्यात आली होती.पाच दिवस पोलीस कोठडी आणि 12 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी नंतर त्याला जामीन मिळाला आहे.शिवप्रेमींचा रोष असल्याने त्याला पोलीस बंदोबस्त पुरवत विमानतळावर पोहचवण्यात आले आहे. प्रशांत कोरटकर रात्री उशिरा विमानाने नागपूरला येण्याची शक्यता आहे.