TRENDING:

Kolhapur News : मुन्ना महाडिकांचा बंटी पाटलांना धोबीपछाड की तडजोड? गोकुळच्या अध्यक्षपदाचा सस्पेन्स आज संपणार

Last Updated:

Kolhapur News : गेल्या काही वर्षांत गोकुळवर सत्तेचा ताबा मिळवण्यासाठी सुरू असलेली रस्सीखेच आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाने महाडीकांची तब्बल 25 वर्षांची सत्ता उलथवून गोकुळमध्ये वर्चस्व मिळवले होते. मात्र आता धनंजय महाडीक गटाकडे सत्ता पुन्हा खेचून आणण्यासाठी जोर लावला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी, कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा आणि कोल्हापूरच्या राजकारणावर प्रभाव टाकणारा गोकुळ दूध संघ पुन्हा एकदा राजकीय संघर्षाचे केंद्र बनले आहे. गेल्या काही वर्षांत गोकुळवर सत्तेचा ताबा मिळवण्यासाठी सुरू असलेली रस्सीखेच आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाने महाडीकांची तब्बल 25 वर्षांची सत्ता उलथवून गोकुळमध्ये वर्चस्व मिळवले होते. मात्र आता धनंजय महाडीक गटाकडे सत्ता पुन्हा खेचून आणण्यासाठी जोर लावला आहे. गोकुळच्या अध्यक्षपदी आता महायुतीचा उमेदवार असणार की तडजोड म्हणून मुश्रीफ यांच्या मुलाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार, याकडे आता लक्ष लागले आहे.
News18
News18
advertisement

महायुतीची जोरदार हालचाल

राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीच्या मोठ्या नेत्यांनी गोकुळच्या सत्ता समीकरणात थेट लक्ष घातले आहे. त्यामुळे आता कोल्हापूरमधील 'मुन्ना विरुद्ध बंटी' या राजकीय संघर्षाला नवं वळण आलं. गोकुळ दूध महासंघाच्या माध्यमातून कोल्हापूरमधील ग्रामीण भागात वर्चस्व मिळवण्याची एक संधी निर्माण होते. त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी याबाबत विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. गोकुळमध्ये सत्तेत असलेले नेते हसन मुश्रीफ यांच्यावरच समन्वयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

advertisement

डोंगळेंचं बंड शांत, पण सत्ता हाताबाहेर?

सध्याचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांचे बंड शांत करण्यासाठी हसन मुश्रीफ यांनी मध्यस्थी केली होती. त्यांनी सतेज पाटील यांच्याशी सहकार टिकवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता वरिष्ठ पातळीवरून आलेल्या आदेशामुळे त्यांनी आपला रोख बदलला असून, महायुती गटाला नेतृत्व देण्याकडे कल दर्शवला असल्याची चर्चा सुरू आहे.

advertisement

कोणाची नावे अध्यक्षपदासाठी?

भाजपचे अंबरीश घाटगे आणि शिवसेनेचे अजित नरके यांची नावे अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. जर महायुतीचे संख्याबळ तसेच राहिले, तर गोकुळचा कारभार पुन्हा एकदा महाडीक गटाच्या हातात जाऊ शकतो.

तडजोड होणार?

कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रात सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यात मैत्रीपूर्ण आघाडी आहे. गोकुळमधील सत्तांतराचा फटका इतर ठिकाणी बसू नये यासाठी मुश्रीफ सक्रीय झाले आहेत. गोकुळच्या अध्यक्षपदी थेट महायुतीचा अध्यक्ष करण्याऐवजी मुश्रीफ हे आपल्या मुलाला अध्यक्षपदी संधी देऊ शकतात. तसे झाल्यास नाविद मुश्रीफ हे गोकुळ दूधसंघाचे अध्यक्ष होऊ शकतील.

advertisement

सध्याचे संचालक मंडळातील बलाबल

सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या राजर्षी शाहू आघाडीचे – 17 संचालक

महाडीक गटाकडे – 4 संचालक

महायुती आणि मित्रपक्षाकडे – 10 जागा

महाविकास आघाडीकडे – 8 जागा

हसन मुश्रीफ यांच्याकडे स्वतंत्रपणे – 3 जागा

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kolhapur News : मुन्ना महाडिकांचा बंटी पाटलांना धोबीपछाड की तडजोड? गोकुळच्या अध्यक्षपदाचा सस्पेन्स आज संपणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल