TRENDING:

Kolhapur: कोल्हापूरमध्ये अग्निशमन दलाच्या नवीन इमारतीचा स्लॅब कोसळला, 1 जणाचा मृत्यू

Last Updated:

कोल्हापुरातील फुलेवाडी भागात ही घटना घडली आहे. रात्रीच्या अंधारात कोल्हापूर महानगरपालिकेच्या फुलेवाडी फायर स्टेशनच्या नूतन इमारतीचे स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ज्ञानेश्वर साळुंखे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

कोल्हापूर: कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. फुलेवाडी अग्निशमन दलाच्या नवीन इमारतीचं बांधकाम सुरू असताना बांधकामाचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत 6 जण स्लॅबखाली अडकले होते. ५ जणांना वाचवण्यात यश आलं. मात्र, एका कामगाराचा मृत्यू झाला. अडीच तास बचावकार्य चालू होतं. जखमी कामगारांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील फुलेवाडी भागात ही घटना घडली आहे. रात्रीच्या अंधारात कोल्हापूर महानगरपालिकेच्या फुलेवाडी फायर स्टेशनच्या नूतन इमारतीचे स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते. स्लॅब टाकत असताना अचानक स्लॅब कोसळला. त्यावेली  सुमारे सहा जण स्लॅबमध्ये अडकले होते. वेळीच त्यापैकी तीन जणांना इतर कर्मचाऱ्यांनी सुखरूपपणे बाहेर काढलं. पण इतर तीन जण स्लॅबच्या ढिगाराखाली अडकले होते

advertisement

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आलं होतं.  आयुक्त के मंजुलक्ष्मी सुद्धा घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी घटनेची माहिती घेतली. कामगारांना बाहेर काढण्याचं काम हाती घेण्यात आलं.  ही इमारत महापलिकेच्या फायर स्टेशनच्या नव्या बांधकामाची होती. ठेकेदाराने कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेतली का याची चौकशी करण्यात येणार आहे. सध्या आम्ही ढिगाऱ्याखाली कोण अडकले का त्यांना वाचवण्याला याला प्राधान्य देत आहोत, अशी माहिती आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी दिली. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही आयुक्तांनी दिले.

advertisement

इमारतीचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू 

दरम्यान, अडीच तास बचावकार्य चाललं होतं. यातून चौघांना वाचवण्यात यश आलं. मात्र, एका कामागाराचा मृत्यू झाला.   नवनाथ आण्णाप्पा कागलकर (वय 38 रा शाहूनगर वडवाडी) असं मयत कामगाराचं नाव आहे.  तर  अक्षय पिराजी लाड (वय 30 रा शिवशक्ती कॉलनी गंगाई लॉन),  दत्तात्रय सुभाष शेंबडे (वय 37), जया सुभाष शेंबडे (वय 56 राहणार. छत्रपती. संभाजीनगर),  वनिता बापू गायकवाड (वय 40 राहणार छत्रपती संभाजीनगर) आणि सुमन सदा वाघमारे (वय 60 रा. छत्रपती संभाजीनगर) अशी जखमींची नावं आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kolhapur: कोल्हापूरमध्ये अग्निशमन दलाच्या नवीन इमारतीचा स्लॅब कोसळला, 1 जणाचा मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल