कोल्हापूर : कोल्हापूर हे शहर कलेचे माहेरघर आहे. तर कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ हे कलेचे उपासक आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. शिवाजी विद्यापीठाच्याच विविध युवा महोत्सवाच्या माध्यमातून एकेक अस्सल कलाकार पुढे येतात. अशाच विद्यापीठातील कलाकारांचा विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने एक सांस्कृतिक सोहळा अर्थात शिव स्पंदन आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याच्या समारोपाच्या दिनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून देशभरातील विविध 75 वाद्यांचा महोत्सव आणि प्रदर्शन पार पडले. विद्यापीठातीलच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली कामगिरी सिद्ध करणाऱ्या कलाकारांनीच हा वाद्य महोत्सव सादर केला.
advertisement
शिवस्पंदनमध्ये सर्वच विभागांचा सहभाग
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या तीन दिवसीय शिवस्पंदन महोत्सवात विद्यापीठातून सर्वच अधिविभागांनी सहभाग घेतला होता. विविध लोकनृत्य, गायन, समूहगीत तसेच विशेष लोकवाद्य महोत्सव आणि प्रदर्शन पार पडले. यामध्ये देशभरातील 75 लोकवाद्यांच्या वादनाचा आस्वाद घेण्यासाठी नागरिकांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली, असे मत विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. पी. टी. गायकवाड यांनी व्यक्त केले.
HSC Board Exam 2024: यंदाचे टॉपर्स तुम्हीच! फॉलो करा अत्यंत महत्त्वाच्या टिप्स
कुलगुरुंनीच मांडली होती वाद्यांची संकल्पना
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त देशभरातील 75 लोकवाद्यांचे वादन आणि प्रदर्शन शिवाजी विद्यापीठात आयोजित करण्याचा मनोदय कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केला होता. त्यांच्याच संकल्पनेतून आणि प्रेरणेतून लोकवाद्य महोत्सव आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते, असे शिवस्पंदन सोहळ्याचे समन्वयक प्रा. डॉ. एन. ए. कांबळे यांनी सांगितले.
चारही दिशांना देशातील चार भागांतील वाद्ये
देशाच्या चार दिशांकडील राज्यांतील वाद्ये विद्यापीठाच्या परिसरात चार दिशांना वाजविण्याचा हा उपक्रम आहे. त्यानुसार, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील हिरवळ, क्रांतीवन परिसर, संगीत आणि नाट्यशास्त्र अधिविभागाशेजारील तलाव आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यासमोरील हिरवळ या चार ठिकाणी हे वादन सादरीकरण करण्यात आले.
भारताला सुवर्णपदक मिळवून द्यायचंय, तरुणाने सोडली सैन्यदलातील नोकरी, आता सरकारकडे केली ही मागणी
प्रदर्शन आणि वादनात ही होती वाद्ये
ढोलकी, ढोलक, पखवाज, मृदुंगम, खोळ, घटम, गंजिरा, खंजिरी, दिमडी, हलगी, पराई, शाहिरी डफ, डफ, डफड, फायबर हलगी, खमक, बुगचू, भपंग, चौंडकं, डमरू, इडक्का, डवर, उडुक्काई, बगलबच्चा, दड्ड, छिंद, डहाका, उरुमी, याकबेर, थाविल, पंबई इसाई, मोडा, कोट्टू, ताशा, चंडा, तुलूनाडू थासे, चेंडा, तबला, संबळ, सनई, बासरी, सुन्द्री, शंख, खालू सनई, नादस्वरम, तोटा, तुणतुणे, तुंबी, मोरसिंग, गोंगाणा, एकतारी, दामलाई डुमलाई, खालुबाजा, खालूची टिमकी, ढोल, पुणेरी ढोल, धनगरी ढोल, पंजाबी ढोल, कच्ची ढोल, थमरू, मोंदल, मुरासू, थापढोल किंवा डोल, नगारा, चौघडा, मांदल, डुग्गी, काटो, तिबेटियन बाऊल किंवा गाँग, इडतालम, खैताळ, घाटी, खुळखुळा, झांज, चिमटा, घुंगरू, करताल, मंजिरी, लेझीम, घोळकाटी, टाळ, चिपळी, घंटा, बडुंगडुप्पा, साप, भोरताल, झेंगाट, बिहू ढोल, बंगाली ढोल, ढाक, पहाडी मांदल ही वाद्य प्रदर्शन आणि वादनात होती.
केवळ एका म्हशीपासून सुरू केला दुग्ध व्यवसाय, आता महिन्याला तरुणाची 1 लाख रुपयांची कमाई Video
दरम्यान सभागृहात पार पडलेल्या 75 वाद्यांच्या वादनाच्या अनोख्या आणि उत्साही सोहळ्याला विद्यापीठातील असंख्य विद्यार्थ्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. तर एकत्र सादरीकरणात कलाकार विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रीयन, पंजाबी, आसामी, साउथ इंडियन, बंगाली अशा अनेक भाषांमध्ये लोकगीते सादर केली आणि त्या भागातील लोकवाद्यांचे वादन करून दाखवले.