TRENDING:

12 फुटांचा किंग कोब्रा कोल्हापूरकरांना दिसला, घाम फुटला खरा पण पुढं थरार घडला...

Last Updated:

10 ते 13 फुटांपर्यंत लांबसडक असलेला हा साप जवळपास 20 ते 25 वर्षे जगतो. त्याचं शरीर एवढं भक्कम असतं की, तो फक्त शेपटीच्या जोरावर उभा राहू शकतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
निरंजन कामत, प्रतिनिधी
advertisement

कोल्हापूर : 'साप' असं नुसतं म्हटलं जरी, तरी अनेकजणांच्या अंगातून भीतीचा शहारा जातो. त्यात जर समोर साप दिसला तर काही विचारायला नको. लहान असो किंवा मोठा असो, सापाची भीती वाटतेच. फार कमी लोक असे असतात जे प्रसंगावधानता दाखवून सापाबाबत सर्पमित्रांना कळवतात आणि मग त्या सापाला सुरक्षितरित्या जंगलात सोडलं जातं. नाहीतरी अनेकजण आपल्या बचावासाठी सापावर हल्ला करतात, त्यात त्यांना दंश होण्याची भीती असते.

advertisement

किंग कोब्रा सापाला नागराज म्हणतात. त्यालाच डोम किंवा काळा साप म्हणूनदेखील ओळखलं जातं. हा साप अत्यंत विषारी असतो. भारतात कर्नाटक, गोवा आणि केरळमध्ये विस्तारलेल्या पश्चिम घाटात तो प्रामुख्यानं आढळतो. तो अतिशय विषारी असल्यानं त्याला जीवनदान दिल्याच्या घटना सहसा घडत नाहीत. त्याला मारून टाकण्यात येत असल्यानं त्याची संख्या फार कमी आहे. अशा परिस्थितीत रविवार, 29 सप्टेंबर रोजी कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील कळसगादे गावात 12 फुटांच्या किंग कोब्राचा बचाव करण्यात आला. यावेळी बघ्यांना घाम फुटला.

advertisement

मानवी वस्तीजवळ हा भलामोठा साप आढळला, त्याला बघून लोक घाबरले खरे, मात्र तो कात टाकण्याच्या परिस्थिती असल्यानं त्याचा बचाव करून नैसर्गिक अधिवासात सोडल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत आवळे यांनी दिली. वनविभागाच्या आरआरटीचे पथक आणि हत्ती हकारा गटाच्या मदतीनं या सापाला जीवनदान देण्यात आलं. प्रदीप सुतार, वनपाल जी. आर. डिसूझा, बी. आर. भांडकोळी, एस. जे. नागवेकर, वनरक्षक प्रकाश शिंदे, के. जी. कातखडे यांनी त्याला वाचवलं.

advertisement

किंग कोब्रा प्रजातीचे साप प्रामुख्यानं भारतासह आशियातील काही देशांमध्ये आढळतात. 10 ते 13 फुटांपर्यंत लांबसडक असलेला हा साप जवळपास 20 ते 25 वर्षे जगतो. त्याचं शरीर एवढं भक्कम असतं की, तो फक्त शेपटीच्या जोरावर उभा राहू शकतो. तो कित्येक दिवस उपाशी राहतो, परंतु इतर विषारी सापांना सरसकट खातो. अनेक प्राणीही त्याच्या निशाण्यावर असतात.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
12 फुटांचा किंग कोब्रा कोल्हापूरकरांना दिसला, घाम फुटला खरा पण पुढं थरार घडला...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल