Snake Facts : बापरे! या सापाकडे पाहणंही खतरनाक, माणूस होतो आंधळा; पण कसा?
- Published by:Priya Lad
Last Updated:
सर्वात विषारी सापांबद्दल बोललं तर इनलँड तैपनचं नाव समोर येतं. त्यात इतके विष आहे की एक थेंब सुद्धा 10 पेक्षा जास्त लोकांचा जीव घेऊ शकतो. पण पृथ्वीवर असाही साप आहे, जो विष थुंकतो.
सर्वात धोकादायक प्राण्यांमध्ये सापाचाही समावेश होता. साप दंश करतात त्यानंतर त्यांचं विष शरीरात पसरतं आणि मग मृत्यू होतो. पण एक साप असा आहे, जो दंशातून नाही तर थुंकीतून आपलं विष सोडतो. तो इतका डेंजर आहे की तुमच्यापासून 9 फूट अंतर दूर असेल आणि त्याने विष थुंकलं तर ते डोळ्यात जाऊन तुम्ही आंधळे होऊ शकता. हा साप कोणता असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
advertisement
झेब्रा स्पिटिंग कोब्रा असं या सापाचं नाव आहे. याचं डोकं काळे किंवा तपकिरी असतं, त्याचा मानेकडील भागही काळा असतो. त्याच्या पोटावर हलक्या तपकिरी किंवा क्रीम रंगाचे पट्टे असतात. जेव्हा ते लहान असते तेव्हा शरीरावर हलके तपकिरी किंवा काळे आणि पांढरे पट्टे दिसतात. जसजसे ते मोठे होतात तसतसा त्यांचा रंग गडद होत जातो.
advertisement
advertisement
advertisement
आता हा साप आढळतो कुठे तर नामिबिया, अंगोला आणि दक्षिण आफ्रिकेच्या जंगलात हा साप आढळतो. आफ्रिकन जंगलात ते रात्रीच्या वेळी रस्ता ओलांडताना दिसतात. त्याचं आयुष्य 12 वर्षांपर्यंत आहे. साधारणपणे लहान पक्षी, मासे आणि बेडूक खाऊन तो आपलं पोट भरतो. जेव्हा त्याला धोका वाटतो तेव्हाच तो आपला फणा पसरवतो. धोका जाणवताच तो लगेच विष फेकतो. तो झोपेत असतानाही हल्ला करू शकतो.