Snake Bite: साप चावल्यानंतर माणसाला कसं वाटतं? शरीरात कोणते बदल होतात?
- Published by:Sayali Zarad
- trending desk
Last Updated:
सर्पदंशाने मृत्यू होण्यात लहान मुलांच प्रमाण देखील जास्त आहे. लहान मुलांचं शरीर लहान असल्यामुळे त्यांच्यावर अधिक परिणाम होतो. एकूण सर्पदंशाच्या घटना आपल्या आजूबाजूला सर्रास घडत असतात. पण, साप चावल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात, हे तुम्हाला माहिती आहे का?
नवी दिल्ली : एका अहवालानुसार, दरवर्षी सुमारे 5.4 दशलक्ष लोक सर्पदंशाचे बळी ठरतात. यापैकी 1.8 ते 2.7 दशलक्ष प्रकरणं विषारी सापांनी दंश केल्याची असतात. सर्पदंशामुळे दरवर्षी सुमारे 81,410 ते 137,880 लोकांचा मृत्यू होतो. यापैकी बहुतांश लोक शेतकरी किंवा शेतीशी निगडित काम करणारे असतात. सर्पदंशाने मृत्यू होण्यात लहान मुलांच प्रमाण देखील जास्त आहे. लहान मुलांचं शरीर लहान असल्यामुळे त्यांच्यावर अधिक परिणाम होतो. एकूण सर्पदंशाच्या घटना आपल्या आजूबाजूला सर्रास घडत असतात. पण, साप चावल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात, हे तुम्हाला माहिती आहे का?
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या (डब्ल्यूएचओ) अहवालानुसार, जगभरात दरवर्षी सर्पदंशामुळे मृत्यू होण्याचं आणि अपंगत्व येण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. 2019 ते 2020 या कालावधीत भारतात 12 लाखांहून अधिक लोकांचा साप चावल्यामुळे मृत्यू झाला होता. ग्रामीण भागात आरोग्य सुविधांचा अभाव असल्याने सर्पदंशावर योग्य उपचार न मिळाल्याने बहुतांश लोकांचा मृत्यू होतो.
डब्ल्यूएचओचं म्हणणं आहे की, सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूंना आळा घालण्यासाठी अँटिव्हेनम उपलब्ध करून देणे, आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे आणि लोकांमध्ये जनजागृती करणे गरजेचं आहे. दुर्गम भागात आरोग्य सुविधांची उपलब्धता वाढवण्यावरही भर देण्याची गरज आहे.
advertisement
साप चावल्यानंतर शरीरात काय बदल होतात?
सर्पदंशामुळे शरीरावर अनेक प्रकारचे दुष्परिणाम दिसून येतात. ज्या ठिकाणी दंश झालेला आहे तिथे तीव्र वेदना होतात आणि सूज येते. सापाचं विष रक्तात मिसळून शरीराच्या इतर भागात पोहोचतं. त्यामुळे रक्तस्त्राव, स्नायू कमकुवत होणे आणि अर्धांगवायूसारख्या समस्या उद्भवू शकतात. काही प्रकरणांमध्ये, रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ लागतात किंवा रक्त खराब होऊ लागतं. फुफ्फुसं, हृदय, किडनी आणि मेंदू यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांवर देखील विषाचा परिणाम होऊ शकतो. काही वेळा दंश झालेला भाग कापावा लागतो. योग्य वेळी उपचार न मिळाल्यास मृत्यूही होऊ शकतो.
advertisement
साप चावल्यानंतर काही वेळाने शरीराचा रंग बदलू लागतो. शरीराचा रंग काळा-निळा होऊ लागतो. तसंच, चक्कर येणं, दृष्टी धूसर होणं, श्वास घेण्यात अडचण येणं, मळमळ होणं, स्नायू कमकुवत होणे किंवा अर्धांगवायू यांसारखी लक्षणं दिसू शकतात. जखमेच्या आजूबाजूची त्वचा काळी पडू शकते. वरची पापणी खाली पडणे, हातापायाच्या बोटांना मुंग्या येणे, गिळण्यास त्रास होणे यासारखी लक्षणं सुद्धा दिसू शकतात.
advertisement
साप चावल्यानंतर काय करावे?
सर्प दंश झालेली जागा साबण आणि पाण्याने स्वच्छ करावी. त्यानंतर ती पट्टीने झाकून टाकावी. त्या जागेचं सतत निरीक्षण करा. तुम्हाला सूज किंवा वेदना यांसारखी संसर्गाची लक्षणं दिसली तर ताबडतोब रुग्णालयात किंवा जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घ्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 06, 2024 11:03 PM IST