TRENDING:

कोल्हापूरच्या रस्त्यावर 'ती' परत अवतरली, गाजवलं होतं 80 चं दशक, आजही कुणी करणार नाही बरोबरी!

Last Updated:

रस्त्यावरुन धावणाऱ्या या दुचाकी आणि चारचाकी वाहनां पाहताना सर्वांना पुन्हा एकदा जुन्या काळात रममान केलं. या प्रदर्शनात सहभागी झालेल्या जावा येजडी क्लासिक मॉडेल पाहायला मिळालं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
निरंजन कामात, प्रतिनिधी 
advertisement

कोल्हापूर : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात कोल्हापूर विंटेज ओनर्स क्लबच्या वतीने विंटेज रॅलीचं आणि प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आल होत. या प्रदर्शनात 1937 पासूनच्या पुढील दुचाकी आणि चार चाकी विंटेज वाहनांचा समावेश होता. ही जुनी वाहनं पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी मोठी गर्दी केली होती.

रस्त्यावरुन धावणाऱ्या या दुचाकी आणि चारचाकी वाहनां पाहताना सर्वांना पुन्हा एकदा जुन्या काळात रममान केलं. या प्रदर्शनात सहभागी झालेल्या जावा येजडी क्लासिक मॉडेल पाहायला मिळालं. 1982 मध्ये श्रेणिक सूर्यवंशी यांच्या आजोबांनी खरेदी केलेल्या या गाडीला आज जवळपास 43 वर्ष होऊन अधिक काळ झालाय. इतकेच नव्हे तर त्यांनी जवळपास दोन पेक्षा अधिक वेळ या गाडीवरून संपूर्ण भारत भ्रमण केलं. ही गाडी आजही सूर्यवंशी कुटुंबाने सुस्थितीत ठेवले आहे. या गाडीबद्दल या गाडीचे मालक श्रेणिक सूर्यवंशी यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

advertisement

लॉटरी लागली! बायको, बहीण, गर्लफ्रेंड कुणालाही घेऊन जा! खरेदीच टेन्शनच नाही, मुंबईत मिळतात 195 रुपयांत कुर्ती

View More

1982 मध्ये, जावा आणि येझडी हे दोन्ही ब्रँड चेकोस्लोवाकिया आणि जर्मनी येथून भारतात आयात झाले होते. यांचा निर्माता जावा मोटर सायकल्स कंपनी होती, ज्याची सहनिर्मिती भारतीय कंपनी राजदूतने केली होती. येझडी ब्रँड हे जावा आणि युगोस्लावियन ब्रँड फॉर्मुला या संमिश्र उगमाने तयार झाले होते.

advertisement

या गाडीच्या इंजिनबद्दल जाणून घेऊ

- 1982 जावा क्लासिक आणि येझडी बाईक्समध्ये 2-स्ट्रोक, 2-सिलिंडर इंजिन आहे.

- जावा क्लासिकमध्ये 250cc इंजिन वापरले जात होते, जे 12-14 बीएचपी पॉवर जनरेट करते.

- येझडी मॉडेल्स 175cc ते 250cc पर्यंतच्या व्हेरियंट्समध्ये उपलब्ध होते.

- जावा क्लासिक बाईक 120 किमी/तास पेक्षा जास्त गती साधू शकत होती. त्याचे पॉवरट्रेन आणि चाके चांगली तग धरणारी होती, ज्यामुळे शहरातील आणि ग्रामीण भागातील दोन्ही वापरासाठी योग्य होती.

advertisement

- येझडी बाईक्स, विशेषतः येझडी सुपर स्पोर्ट्स मॉडेल, हाय-स्पीड राइडिंग आणि लांब ट्रिपसाठी लोकप्रिय होती.

- जावा क्लासिकचा डिझाइन मुख्यतः रेट्रो वायब देणारा होता. त्यात गोलाकार हेडलाइट, कर्व्ड टंकी आणि साधे, क्लासिक लाईन्स होते.

- येझडी बाईक्स, त्यांच्या कडक आणि स्टायलिश डिझाइनसाठी प्रसिद्ध होत्या. स्पीड मीटर, स्पीडोमीटर, मोठा हेडलाइट आणि कन्सोल हे त्याच्या डिझाइनचे मुख्य आकर्षण होते.

advertisement

- जावा आणि येझडी बाईक्स त्याच्या ठोस बांधणी आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या इंजिनसाठी ओळखल्या जात होत्या. ही बाईक्स काही राइडर्ससाठी एक प्रकारे लाँग-लाइफ बाईक म्हणून मानली जात होती.

- या मोटारसायकल्सचा भारतीय बाजारात मोठा प्रभाव होता, आणि तेव्हा अनेक युवकांसाठी हे बाईक एक आदर्श होता.

- जावा आणि येझडी बाईक्स एक प्रकारे स्वतंत्र आणि स्टायलिश राइडिंग अनुभव देत होती.

- जावा क्लासिकच्या सध्याच्या काळात पुनरुज्जीवन केले गेले आहे. भारतात जावा मोटरसायकल्सने पुन्हा बाजारात प्रवेश केला आणि त्याच्या नवीन मॉडेल्सना एकाच पारंपारिक आणि आधुनिक डिझाइनचे मिश्रण दिले आहे.

- याला आधुनिक इंजिन आणि तंत्रज्ञान वापरून अपडेट केले गेले आहे, जे आजच्या काळातील राइडिंग अनुभवाशी जुळवून घेत आहे.

1982 जावा क्लासिक आणि येझडी बाईक्स भारतीय मोटरसायकल उद्योगासाठी ऐतिहासिक महत्त्वाच्या होत्या. त्या काळातील राइडिंग अनुभव आणि डिझाइन अजूनही काही लोकांच्या मनात आहेत, असं श्रेणिक सूर्यवंशी यांनी सांगितलं.

दुचाकीमध्ये प्रसिद्ध असलेली 1947 ची बॅन्टम दुचाकी, बीएसए, 1952 ची बुलेट, 1957 ची बीएमडब्ल्यू कंपनीची बुलेट, व्हेस्पा, लक्ष्मी, लॅम्ब्रेडा, बॉबी, जावा, येजदी कंपनीच्या जुन्या काळातील दुचाकींचा समावेश होता तर चारचाकीमध्ये 1937 पुढच्या मॉडेलची ऑस्टीन, 1964 ची इम्पाला, कॉन्टेसा, मर्सडिज, ओपन जीप अशा अनेक प्रकारच्या चारचाकीचा समावेश होता. 2016 मध्ये विवेकानंद कॉलेजमध्ये भरविण्यात आलेल्या एका वाहनांच्या शोमधून काही तरुणांना ही कल्पना सुचली आणि विविध क्षेत्रातील तरुणांनी एकत्र येऊन त्यांनी या विटेंज कारच्या फेरीचं नियोजन केलं.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
कोल्हापूरच्या रस्त्यावर 'ती' परत अवतरली, गाजवलं होतं 80 चं दशक, आजही कुणी करणार नाही बरोबरी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल