आर. माधवन आणि कोल्हापूरचे मित्र..
कोल्हापुरात राजाराम कॉलेजमध्ये आर माधवनने आपले शिक्षण पूर्ण केले आहे. तर कोल्हापुरातच त्याला त्याची सहचारिणी मिळाली आहे. त्यामुळे त्याचे कोल्हापूरशी एक अनोखे नाते आहे. कित्येकदा कोल्हापूर आणि इथल्या अनेक गोष्टींबाबत तो भरभरून बोलत असतो. करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या कृपेनेचे कोल्हापुरात विश्वास नांगरे पाटील, सतेज (बंटी) पाटील, संभाजीराजे छत्रपती यांच्यासह अनेक चांगले मित्र मिळाल्याचे देखील आर. माधवनने एका मुलाखतीत सांगितले होते.
advertisement
विश्वास नांगरे पाटीलही शिकले कोल्हापुरात..
कॉलेजमध्ये असताना आर माधवन बरोबर दुसऱ्या एका व्यक्तीची कोल्हापूरशी नाळ जोडली गेली, ती म्हणजे IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील. सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक म्हणून आयपीएस विश्वास नांगरे पाटील कार्यरत आहेत. मात्र कोल्हापुरात असताना आपल्या मित्रांसोबत फिरणे, मजा करणे, चित्रपट पाहायला जाणे अशा गोष्टीही भरपूर केल्या आहेत.
3 तृतीयपंथी मैत्रिणी, एक वकील, एक नर्स अन् तिसरी MPSC ची करतेय तयारी!
प्रा. मौर्य, विश्वास नांगरे पाटील आणि आर. माधवनची मैत्री...
प्रा. संजय मौर्य हे आयपीएस विश्वास नांगरे पाटील आणि आर. माधवन दोघांचेही जवळचे मित्र आहेत. ते स्वतः 1992 साली कोकणातून कोल्हापुरात शिक्षणासाठी आले होते. सध्या ते त्या कॉलेजमध्ये गणित विभागप्रमुख पदावर आहेत. कोल्हापुरातल्या राजाराम कॉलेजच्या हॉस्टेलवरच त्यांची भेट आर. माधवन आणि विश्वास नांगरे पाटील यांच्याशी झाली होती.
आर. माधवनसोबतची पहिली भेट..
प्रा. मौर्य सांगतात की, आर माधवन सोबतची पहीली भेट मी कधीच विसरू शकत नाही. कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले तेव्हा आर माधवन आणि विश्र्वास नांगरे पाटील यांच्या नावाचे एक वेगळे वलय निर्माण झाले होते. तेव्हा मी हॉस्टेलमध्ये गेलो होतो. 23 नंबरची आर माधवनची खोली होती. आत जाताच आर माधवनने मला एक चॉकलेटचा डबा दिला होता. मी तो डबा उघडताच एकदम स्प्रिंग लावलेला खोटा साप अंगावर आला. मी त्याला त्याबद्दल विचारले तर माधवनने सांगितले होते की, "मी चित्रपट क्षेत्रात जाणार आहे. लोकांचे वगवेगळे भाव टिपून घेत आहे." खरंतर त्या स्प्रिंगवाल्या खेळण्यात एक कॅमेरा बसवला होता. ज्यातून त्याने माझा मी भ्यालो तेव्हाचा फोटो काढला होता.
अशीही दोस्ती, मुक्या जीवांना लागला माणसाचा लळा, Video
'यार संजय, मैं तो पास हो गया'
खरंतर प्रा. मौर्य हे विश्वास नांगरे पाटील आणि आर. माधवन यांचे ज्युनियर होते मात्र तरीही हळूहळू त्यांची मैत्री दृढ होत गेली. ते अभ्यासात देखील एकमेकांना मदत करायचे. याबाबतचा किस्सा देखील मौर्य यांनी सांगितला आहे. आर माधवनला सांख्यिकी विषय अर्थात स्टॅटॅस्टिक थोडा अवघड वाटायचा. दुसऱ्या वर्षात तो या विषयात नापासही झाला होता. माझे गणित चांगले असल्यामुळे त्याने मला पुन्हा परिक्षा देताना त्या विषयात मदत मागितली होती. मग परीक्षेआधी आठवडाभर आम्ही रात्री 3 वाजेपर्यंत अभ्यास केला होता. त्यावेळी 20-20 मार्कांचे पाच प्रश्न असे शंभर मार्कांची परीक्षा असायची. तर आम्ही ज्या चार प्रश्नांचा अभ्यास केला होता तेच परीक्षेमध्ये आल्यामुळे त्यातील तीन प्रश्न आर. माधवनने फार चांगल्या पद्धतीने सोडवले होते. त्याला आपण आता पास होणारच याचा इतका विश्वास वाटू लागला, परीक्षा देऊन बाहेर येताच त्याने मला सांगितले होते की, 'यार संजय, मैं तो पास हो गया..'
आर. माधवनचा आवडता शिरा पाव
कॉलेजमध्ये असताना आम्ही सगळे कॉलेज जवळचा वडापाव खायला जायचो. यामध्ये आर. माधवन, विश्वास नांगरे पाटील असे सगळे असायचे. त्यावेळी माधवनने आम्हाला सगळ्यांना एक वेगळीच डिश खायला शिकवली होती. त्याला शिरा पाव खायला खूप आवडायचे. त्यामुळे इतरही काही मित्रांना त्याची आवडती ही वेगळी डिश खायची सवय लागली होती, असेही मौर्य यांनी सांगितले.
विश्वास नांगरे पाटील यांना आली होती निराशा
पुढे कॉलेजनंतर विश्वास नांगरे पाटील हे मुंबईला अभ्यासासाठी गेले होते. यूपीएससी मधील त्यांच्या दोन संधी हुकल्यानंतर ते खरंतर बरेच निराश झाले होते. तेव्हा नांगरे पाटील हे एकदा शिवाजी विद्यापीठात आले होते. मी विद्यापीठातच एम.एस.सी. करत होतो. निरशेत त्यांनी मला बोलून दाखवले होते की,"माझी आता ही शेवटची संधी आहे, मला यश नाही आले तर मी राजकारणात जाण्याचा विचार पक्का केलाय." यावर मी त्याला धीर देऊन त्याचा आत्मविश्वास वाढवला होता. पुढे खरंच विश्वास नांगरे पाटील यांना यश प्राप्त झाल्याने ते पेढे घेऊनच कॉलेजमध्ये आले होते. कॉलेजमध्ये त्यांचा सत्कारही त्यावेळी करण्यात आला होता. त्यावेळी मी या राजाराम कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झालो होतो, असे मौर्य यांनी सांगितले आहे.
आर. माधवनचा पहिला चित्रपट..
कॉलेजच्या कॅम्पसमध्ये एकत्र फिरणे, कॅन्टीनवर गप्पाटप्पा, चित्रपटगृहात एकत्र चित्रपट पाहायला जाणे, अशा अनेक गोष्टी आम्ही एकत्र केल्या आहेत. एकदा कॅन्टीनवर चहा पिण्याऐवजी त्याचे पैसे साठवून आम्ही सगळेजण चालत कोल्हापुरातील का चित्रपटगृहात चित्रपट पाहायला गेलो होतो. जेव्हा आर माधवनचा मुख्य भूमिका असणारा पहिला चित्रपट 'रेहना है तेरे दिल में' प्रदर्शित झाला होता, तेव्हा आम्ही बाकीचे मित्र मिळून त्याच चित्रपटगृहात तो चित्रपट पहिल्यांदा पाहिला होता, असेही मौर्य म्हणालेत.
अशी ही प्राध्यापक मौर्य, आर. माधवन आणि विश्वास नांगरे पाटील यांची मैत्री आजही अबाधित आहे. त्यांच्याप्रमाणे तुमचीही मैत्री अशीच बहरत राहो, हीच सदिच्छा. मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.