TRENDING:

जीव वाचवणारे इंजेक्शन मिळेना! कोल्हापूरच्या सीपीआरमध्ये फॅक्टर 8-9 चा तुटवडा; गरीब रुग्णांची वाढली धाकधूक!

Last Updated:

कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात (सीपीआर) हिमोफेलियाग्रस्त रुग्णांसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या फॅक्टर 8 व फॅक्टर 9 या जीवनावश्यक...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोल्हापूर : हिमोफेलिया... या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी फॅक्टर 8 व फॅक्टर 9 ही इंजेक्शन्स म्हणजे जीवनावश्यक आधार. पण सध्या कोल्हापूरच्या सीपीआर (छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय) मध्ये याच इंजेक्शन्सचा तुटवडा निर्माण झाल्याने शेकडो रुग्णांची धाकधूक वाढली आहे. जिथे हे इंजेक्शन सीपीआरमध्ये मोफत मिळते, तिथे खासगी रुग्णालयात त्यासाठी तब्बल 20 हजार रुपये मोजावे लागतात. सर्वसामान्य रुग्णांसाठी शासकीय रुग्णालये आधारवड असताना, या इंजेक्शनच्या तुटवड्याने ते भयभीत झाले आहेत.
Kolhapur News
Kolhapur News
advertisement

हिमोफेलियाचे भयावह वास्तव

जिल्ह्यात हिमोफेलियाचे सुमारे 500 रुग्ण आहेत. त्यापैकी 350 हून अधिक रुग्ण सीपीआरमध्ये उपचार घेतात, तर उर्वरित 150 खासगी रुग्णालयांवर अवलंबून आहेत. फॅक्टर 8 ची गरज असलेल्या रुग्णांची संख्या 350 आहे, तर फॅक्टर 9 चे 150 रुग्ण आहेत. या आजाराची लक्षणे गंभीर असतात: गुडघे, कोपर किंवा इतर स्नायूंमध्ये सूज येणे, सतत कळ असणे. याहूनही चिंतेची बाब म्हणजे, जखम झाल्यास रक्त थांबत नाही. त्यामुळे अशा रुग्णांना नेहमीच अत्यंत सावध राहावे लागते. कुटुंबातील 33 टक्के सदस्यांना हा आजार नसला, तर तो पुढच्या पिढीत येण्याची शक्यता कमी असते. मात्र, अनेकदा जनुकीय बदलांमुळे (म्युटेशन) किंवा विशिष्ट प्रोटिन्सच्या कमतरतेमुळेही हा आजार होऊ शकतो.

advertisement

कशामुळे होतो हा आजार?

हा आजार प्रामुख्याने आनुवंशिक परिवर्तनामुळे होतो. ही जनुकीय प्रक्रिया रक्ताला गोठवणाऱ्या प्रोटिन्सच्या निर्मितीला बाधित करते, ज्यामुळे आजार बळावत जातो. हिमोफेलिया फॅक्टर 8 व फॅक्टर 9 ही इंजेक्शन्स रक्तातील क्लॉटिंग (रक्त थांबविण्याची) क्षमतेसाठी आवश्यक घटकांची कमतरता भरून काढण्यासाठी वापरली जातात. ही दोन्ही इंजेक्शन्स म्हणजे त्या विशिष्ट फॅक्टरची कृत्रिम पूर्तता होय. ही इंजेक्शन्स रुग्णाच्या रक्तात दिली जातात, जेणेकरून त्यांच्या रक्तात रक्ताची गाठ (क्लॉट) तयार होण्याची क्षमता निर्माण होईल. ही इंजेक्शन्स डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या निगराणीखालीच दिली जातात.

advertisement

जेनेटिक ब्लिडिंग डिसऑर्डर म्हणजे काय?

हा आजार प्रामुख्याने आनुवंशिक असल्याने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. यात नाकातून रक्त येणे किंवा जखमेतून रक्त न थांबणे ही प्रमुख लक्षणे आढळतात. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला हा त्रास असल्यास, तो पुढच्या पिढीतही संक्रमित होण्याची शक्यता असते. गंभीर आजाराच्या वेळी, शिरेतून रक्त देऊन या आजारावर उपचार केले जातात. कोल्हापूर जिल्ह्यातील हिमोफेलिया रुग्णांना फॅक्टर 8 आणि 9 या इंजेक्शन्सची तातडीने गरज आहे. सीपीआरमध्ये त्यांचा तुटवडा असल्याने, गरीब रुग्णांची धाकधूक वाढली आहे. त्यामुळे, सीपीआरमध्ये या जीवनावश्यक इंजेक्शन्सचा मुबलक साठा तात्काळ उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे आहे.

advertisement

हे ही वाचा : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनआधी मिळणार गिफ्ट, या दिवशी खात्यावर जमा होणार 1500 रुपये

हे ही वाचा : हुपरी ते टेक्सास! गावच्या पोराचं मोठं काम; सुईशिवाय लसीकरण जगातील पहिलं संशोधन

मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
जीव वाचवणारे इंजेक्शन मिळेना! कोल्हापूरच्या सीपीआरमध्ये फॅक्टर 8-9 चा तुटवडा; गरीब रुग्णांची वाढली धाकधूक!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल