TRENDING:

शेतात शॉक लागून होणाऱ्या अपघातांमध्ये वाढ, शेतकऱ्यांनी नेमकी काय घ्यावी काळजी?

Last Updated:

पावसाळ्याच्या दिवसात शेतकऱ्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
advertisement

कोल्हापूर : पावसाळ्यात शेतकऱ्यांना धोकादायक आणि कष्टाचे काम करावे लागते. शेतामध्ये काम करताना साप, विंचू अशा प्राण्यांचा धोका ओळखून काम करावे लागते. मात्र, कोल्हापुरात मागच्या काही दिवसात शेतात शॉक लागून आपला जीव गमावला आहे. शेतात गेल्यावर अचानकपणे एखाद्या तुटून पडलेल्या तारेला धक्का लागून या अशा दुर्घटना घडल्याचे पाहायला मिळतात. मात्र, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी शेतात काम करताना सगळ्यात जास्त काळजी घेण्याची गरज असते. आपला जीव सुरक्षित रहावा, यासाठी नेमके कोणते सतर्कतेचे उपाय करावे, याबाबत कोल्हापुरातील सहाय्यक विद्युत निरीक्षकांनी माहिती दिली आहे.

advertisement

लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, खरंतर पावसाळ्याच्या दिवसात घरात, घराबाहेर पाण्यामुळे ओलसर झालेल्या ठिकाणी वीज प्रवाह उतरू शकतो. त्यातच शेतात देखील ही भीती सर्वात जास्त असते. शेताच्या वरून एखादी जर विजेची तार जात असेल तर त्या शेतकऱ्याने सर्वात जास्त काळजी घेतली पाहिजे. अन्यथा आपला जीव गमावण्याची वेळ देखील त्यावर येऊ शकते, असे प्रभाकर पतंगे या विद्युत निरीक्षकांनी सांगितले आहे.

advertisement

डोंबारी खेळ बंद पडल्यानं मोलमजूरी करण्याची वेळ, पोटाची खळगी भरण्यासाठी कुटूंब वारीत सहभागी! नेमकं काय करताय?

नेमकी काय घ्यावी काळजी?

पावसाळ्याच्या दिवसात शेतकऱ्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी खालील प्रमाणे महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

1) शेतकऱ्यांनी त्यांचे विद्युत संच मांडणीही सुस्थितीत असली पाहिजे. त्यामध्ये जोडलेले केबल्स, जोडलेल्या मीटरपेटी, त्यामध्ये असलेले स्विच गिअर्स हे सर्व नीट काम करत असल्याची खात्री करुन त्याची वेळेवर देखभाल दुरुस्ती करून घेतली पाहिजे.

advertisement

2) घरगुती विद्युत उपभोक्तांप्रमाणे शेतकऱ्यांनीही प्रत्येक संच मांडणीमध्ये मीटरनंतर आरसीसीबी हे उपकरण बसवले पाहिजे. आरसीसीबी बसवल्यानंतर एखादी मोटर शॉर्ट झाली असेल आणि त्यातून अर्थ लिकेज करंट प्रवाहात होत असेल, तर आरसीसीबी लगेच ट्रीप करेल आणि पुढच्या धोक्यापासून शेतकरी वाचू शकेल.

Rain in Maharashtra : पुण्यासाठी पुढील काही तास महत्त्वाचे; तुमच्या जिल्ह्यात कशी राहणार परिस्थिती?

advertisement

3) एखाद्या शेतामधून जर विजेच्या तारा जात असतील, तर शेतकऱ्यांनी शेतामध्ये जाताना प्रत्येकवेळी महावितरणच्या त्या तारांकडे पाहणे गरजेचे आहे. कारण कदाचित विद्युततारा जुन्या झाल्यामुळे काही वेळा कंडक्टर खाली पडतात. अशावेळी बऱ्याचदा तो कंडक्टर व्यवस्थित जमिनीवर न पडल्यामुळे किंवा आर्थिंग नीट न झाल्यामुळे एखादा शेतकरी त्याच्या संपर्कात गेल्यास त्याला शॉक बसतो.

दरम्यान, अशा काही गोष्टी जुन्या झाल्या असतील, काहीही तक्रारी असतील, तर त्या महावितरणच्या कार्यालयाला सांगून वेळीच त्यांचे निरसन करून घेतल्या पाहिजेत. तरच असे अपघात आपण वाचवू शकतो. तसेच विद्युत वापरासंबंधी जास्तीत जास्त सुरक्षा बाळगली गेली पाहिजे, त्यासाठी जास्तीत जास्त प्रबोधन करून हे विद्युत अपघात दूर करता येतील. हे विद्युत अपघात शून्य कसे करता येतील, हेच महावितरण कार्यालयांचे मुख्य उद्दिष्ट आहे, असेही प्रभाकर पतंगे यांनी स्पष्ट केले आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
शेतात शॉक लागून होणाऱ्या अपघातांमध्ये वाढ, शेतकऱ्यांनी नेमकी काय घ्यावी काळजी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल