पणजोबा होते सैन्यात
कोल्हापुरात भोसलेवाडी येथे राहणाऱ्या संग्राम माटे यांनी 2005 साली सलून व्यवसाय सुरू केला होता. पुढे ते आणि त्यांचे भाऊ योगिराज माटे हे एकत्रच काम करू लागले. आपल्या सलूनमध्ये ते आजी-माजी सैनिकांसाठी उपक्रम राबवतात. खरंतर त्यांचे पणजोबा बळवंतराव रावजी माटे हे भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी सैन्यात भारतीय रेजिमेंट मध्ये कार्यरत होते. सध्या पाकिस्तानात असलेल्या क्वेटा या गावात ते सैन्य अधिकारी म्हणून देशसेवा करत होते.
advertisement
भेलपुरीचा गाडा चालवत केली सैन्याची तयारी; बापाच्या निधनानंतर पोरांनी आईच्या मेहनतीचं केलं चीज
का आणि कधी सुरू केला उपक्रम?
2019 सालच्या पुलवामा हल्ल्यानंतर अख्खा देश हादरला होता. त्यावेळी देश आणि सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि पणजोबांच्या स्मरणार्थ म्हणून माटे बंधूंनी हा उपक्रम सुरू केला. आजही ते हा उपक्रम राबवत आहेत, असे योगिराज माटे यांनी सांगितले.
सध्या दोन दुकानात दिली जाते सेवा
योगिराज यांच्या जाधववाडी येथील सलून मध्ये सुरू केलेला हा उपक्रम त्यांचे भाऊ संग्राम माटे यांच्या कदमवाडी-बावडा रोड येथील दुकानात देखील सुरू आहे. हा उपक्रम राबवत असताना योगिराज माटे यांच्या बाबतीत फसवणुकीचा प्रकारही घडला होता. सैन्य अधिकारी बोलत असल्याचे भासवून भरपूर सैनिकांचे केस कटिंग करण्यासाठी फोनवरून त्यांची फसवणूक करण्यात आली होती. त्यामुळे सैनिकांचे ओळखपत्र पाहूनच आम्ही त्यांना ही सेवा देतो, असेही योगिराज यांनी स्पष्ट केले.
दीड वर्षांचा चाणक्य, कोल्हापूरचा अर्शित ठरला जिनियस बालक
आम्हाला माटे बंधूंचा अभिमान
माटे बंधूंच्या या अनोख्या उपक्रमाचे आजी-माजी सैनिकांकडून भरभरून कौतुक होतंय. आम्हाला सैन्यातून परत आल्यानंतर तिकडे आम्ही देशसेवा करतो पण नागरी वस्तीत आम्हाला कोणी विचारेल तरी की नाही, असेच वाटत असते. मात्र माटे बंधूंनी आमच्यासाठी सुरू केलेल्या या उपक्रमामुळे आम्हाला त्यांचा अभिमानच वाटतो, अशा भावना निवृत्त सैनिक श्रीधर कुंभार यांनी व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, अनेकदा सध्या कार्यरत असणारे सैनिक मोफत सेवा घेण्यास देखील नकार देतात. आम्ही देशासाठी लढतो. देशाची सेवा करतो. त्यामुळे पूर्ण मोफत सेवा न देता आमच्याकडून थोडीफार रक्कम घ्यावी, असेही अनेक सैनिक म्हणत असल्याचे देखील योगिराज माटे यांनी सांगितले आहे.
दुकान पत्ता :
मल्हार जेंट्स पार्लर
1) योगिराज माटे - इंद्रजित कॉलनी समोर, जाधववाडी, कोल्हापूर.
3) संग्राम माटे - ओनेक्स प्लाझा, कदमवाडी-बावडा रोड, कोल्हापूर.
संपर्क :
योगिराज माटे +91 77440 24091
(गुगल मॅपवरून साभार)