कोल्हापूर : झाडे ही आजची सर्वात महत्त्वाची गरज आहे. बऱ्याच ठिकाणी मोकळ्या जागेत वृक्षारोपण केले जाते. पण शहरीकरणामुळे सध्या जागेचा अभाव जाणवू लागला आहे. त्यामुळे बोनसायची संकल्पना अशा वेळी उपयुक्त ठरते. आपल्याला हव्या त्या मोठ्या बुंध्याच्या झाडांचे बोन्साय बनवता येते. अगदी मोठ्या डेरेदार वृक्षांप्रमाणेच हे झाड एका छोट्या कुंडीत वाढते. त्यामुळे ते झाड आपल्या बाल्कनीत, अंगणात किंवा परसात देखील लावू शकतो. याच बोन्साय बद्दल कोल्हापुरातील एका नर्सरी चालकाने माहिती दिली आहे.
advertisement
कोल्हापुरात कळंबा येथे दत्तात्रय कासोटे हे गेली वीस वर्षे नर्सरी व्यवसाय करतात. त्यांच्या साईप्रसाद बायोटेकमध्ये विविध प्रकारची सामान्य झाडे, फळझाडे, फुलझाडे, शोभेची झाडे त्याचप्रमाणे शेतीसाठी लागणाऱ्या रोपांचा पुरवठा केला जातो. या नर्सरीमध्ये बोन्साय सुद्धा बनवला जातो. वड, पिंपळ, उंबर, आंबा यासारख्या रोपांचेही बोन्साय बनवले जातात, असे दत्तात्रय कासोटे सांगतात.
लसणाची साल टाकून देताय? निरुपयोगी सालीचे आहेत आश्चर्यकारक फायदे, असा करा वापर, Video
बोन्साय म्हणजे काय?
बोन्साय म्हणजे मोठ्या झाडाची छोटी प्रतिकृती असेच म्हणता येऊ शकते. बोन्साय ही मूळची चायनीज संकल्पना आहे. इतिहासामध्ये याचे पुरावे पाहायला मिळतात. त्यानंतर जपानमध्ये याचा प्रचार प्रसार झालेला दिसतो. निसर्गाची ऊर्जा आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी किंवा एक शुभ झाड म्हणून बोन्सायची रचना केली जाते. हे बोन्सायचे झाड घरी किंवा ऑफीसमध्ये ठेवल्याने एक सकारात्मक ऊर्जा मिळते. तसेच ते आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवले जाते, अशी माहिती कासोटे यांनी दिली आहे.
कोणत्या झाडांचे करता येते बोन्साय?
बोन्सायचा अर्थच असा की, मोठा वृक्षाची छोटी प्रतिकृती बनवणे. यामध्ये मग ज्यांचा बुंधा मोठा होतो अशी मोठी फळ झाडे, वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे, काही शोभेची झाडे, त्याचबरोबर वड, पिंपळ उंबर या झाडांचे बोन्साय करता येऊ शकते.
बालपणीच गेली दृष्टी, पण चमकण्याची जिद्द कायम, RJ शाहनवाज कसा बनला रेडिओचा बादशाह? Video
बोन्साय झाडांना फळे लागतात का?
एखाद्या फळ झाडाचे बोन्साय केले, तर झाडाची वाढ पूर्ण झाल्यानंतर वयोमानाप्रमाणे त्याला फळधारणा देखील होते. मात्र मोठ्या झाडाला जितक्या प्रमाणात फळधारणा होण्याची शक्यता असते, तेवढी बोन्सायला मिळत नसली, तरी बोन्सायला फळधारणा होते.
किती रुपये असते किंमत?
बोन्सायची किंमत ही त्या झाडाच्या वयावर आणि आकारावर ठरत असते. झाडाचे वय जितके जास्त असते आणि त्याचा आकार जितका चांगला तयार झालेला असतो, त्यानुसार त्या बोन्सायची किंमत ठरवली जात असते. सर्वसाधारणपणे कमीत कमी पाच हजारांपासून ते जास्तीत जास्त दीड लाख दोन लाखांपर्यंत सुद्धा त्याची किंमत बाजारामध्ये होत असते.
दरम्यान, बोन्सायचे काळजी हे इतर झाडांप्रमाणेच घ्यावे लागते. हवामानाच्या परिस्थितीनुसार सूर्यकिरणे येतील अशा ठिकाणी बोन्सायचे घरातील स्थान बदलले पाहिजे. बोन्सायला नियमित पाणी देखील घातले पाहिजे. तर बोन्सायची छाटणीही नीट केली गेली पाहिजे, असेही कासोटे यांनी स्पष्ट केले आहे.