कोण आहेत वेदांते गुरुजी?
लालबागच्या राजाचे मुख्य पुजारी असणारे अरविंद वेदांते गुरुजी हे मूळचे कोल्हापुरातील आहेत. त्यांचं मूळ गाव बहिरेश्र्वर आहे. तर ते सध्या फुलेवाडी येथे वास्तव्य करतात. मात्र गेली कित्येक वर्ष सातत्य राखत दरवर्षी ते लालबागच्या राजाची सेवा करायला कोल्हापूरहून मुंबईला जात असतात.
कोल्हापूरच्या अंबाबाई देवीचा गाभारा होणार सुरु, पाहा कधीपासून मिळणार दर्शन
advertisement
अशी झाली आहे लालबागच्या राजाची सुरुवात
खरंतर 'लालबागचा राजा' हा मुंबईमधील एकमेव गणपती असा आहे की, त्याच्या नावाने मुंबईच्या सार्वजनिक गणपतींची ओळख होते. मुंबईतील कोळी बांधवांनी या गणपतीची प्रथम प्रतिष्ठापना 1934 मध्ये केली होती. तेव्हा तो 'गरमखाड्याचा गणपती' म्हणून ओळखला जात होता. कारण त्या ठिकाणी जवळच एक मोठा तलाव खणला होता आणि त्यात शेजारच्या दिग्विजय मिलमधील बॉयलरचे गरम पाणी सोडले जात असे. त्यानंतर काही काळाने त्याचे नाव 'गरमखाडा न्यू मार्केटचा गणपती' असे झाले. पण व्यापाऱ्यांच्या आणि कोळी समाजाच्या दृष्टीने तो त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा 'राजा' होता. त्याला नवस केला आणि इच्छापूर्तिनंतर तो भक्तिभावाने फेडेन अशी मनापासून खात्री दिली, तर तो भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतो, अशी त्याची दूरवर ख्याती पसरायला लागली होती. त्यामुळे हळुहळु तो 'नवसाचा राजा' बनला.
अरविंद वेदांते झाले मुख्य पुजारी
लालबागचा राजा गणेशमंडळाकडून गणेशाची पूजा करण्यासाठी मालवणच्या एका पटवर्धन भटजींना नेमण्यात आले होते. त्यांच्या पश्चात अरविंद वेदांते हे 1980 साली लालबागच्या राजाची पूजा करु लागले. वेदांते हे त्या काळी मुंबईत शिक्षण घेण्यास गेले होते. पटवर्धन यांच्याशी वेदांते यांचे सलोख्याचे संबंध होते. त्यांच्याकडून शास्त्रोक्त ज्ञान देखील वेदांते घेत होते. त्यातच पटवर्धन यांच्यानंतर अरविंद वेदांते यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून गणपतीच्या पूजाविधी संदर्भात विचारणा झाली. तेव्हापासून आजतागायत अरविंद वेदांते हेच लालबागच्या राजाचे मुख्य पुजारी आहेत.
Video : यंदा आवाज कमीच, गणेशोत्सवात डॉल्बीसाठी कडक नियम
लालबागच्या राजाचे सर्वच विधी करतात वेदांते गुरुजी
अरविंद वेदांते हे गणेशोत्सव काळात दहा दिवस कोल्हापूरहून मुंबईला जाऊन लालबागच्या राजाची पूजाअर्चा करत असतात. मात्र गणेशोत्सवाव्यतिरिक्त लालबागच्या राजाचा मुहूर्त किंवा पाद्यपूजन सोहळा, मंडप पूजन अशा सोहळ्यांवेळी देखील वेदांते गुरुजींनाच बोलावले जाते. गणेशोत्सव काळात तर त्यांना बोलायला देखील वेळ मिळत नसतो. रोज सकाळी 5.30 ते रात्री 9.30 वाजताची आरती होईपर्यंत वेदांते गुरुजी लालबाग राजाच्या पायांजवळ थांबलेले असतात. येणाऱ्या प्रत्येक भक्ताकडून पूजा साहित्य, हारतुरे, प्रसाद स्विकारून तो देवाला अर्पण करतात. त्याच बरोबर देवाचे पूजन, आरती आदी देखील वेदांते गुरुजींच बघत असतात.
गणेश चतुर्थीला काय असते चित्र ?
लालबागच्या राजाची एक झलक पाहण्यासाठी लाखो भक्तांची मांदियाळी गणेशोत्सव काळात येत असते. त्याच लालबागच्या राजाची गणेशचतुर्थीला विधिवत प्राणप्रतिष्ठापना वेदांते गुरुजी दरवर्षी करत असतात. गणेश चतुर्थीला पहाटे 3.30 वाजता स्टेजवर वेदांते गुरुजींना जावे लागते. सर्व मांडणी आणि तयारी पूर्ण करून पहाटे 4.30 वाजता गणेशाचा प्राणप्रतिष्ठापना विधी सुरू होतो. त्यानंतर मंडप उद्घाटन आणि गणेश मंडळाचा वार्षिक अहवाल वाचन होऊन भक्तांना लालबागच्या राजाचे दर्शन घेऊ दिले जाते, असे वेदांते यांनी सांगितले.
Video: सैनिक करतात देशसेवा आम्ही करू त्यांची सेवा, माटे बंधूंचा अनोखा संकल्प
सर्वांचीच असते राजाच्या चरणी मागणी
गरीब-श्रीमंत, लहान-मोठे अशा सर्वांचीच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गर्दी होत असते. यामध्ये उद्योगपती, कलाकार, राजकारणी, खेळाडू कित्येक थोरामोठ्यांचा देखील समावेश असतो. या प्रत्येकाचे काही ना काही मागणे लालबागच्या राजाकडे असते. या सर्वांचा नमस्कार पूजाविधी करत राजापर्यंत पोहोचवण्याचे पुण्यकर्म मला करायला मिळणे हेच मी भाग्य समजतो. जीवात जीव असेपर्यंत सर्वांच्याच लाडक्या बाप्पाची सेवा करायला मिळो, अशी इच्छा असल्याचे देखील वेदांते यांनी बोलून दाखवले.