हादगा म्हणजे नवरात्रीत हस्त नक्षत्राच्या दिवशी खेळला जाणारा एक पारंपरिक खेळ. पाटावर हत्तीचे चित्र काढून त्याची पूजा केली जाते आणि मुली पाटाभोवती रिंगण धरून फेर धरत गाणी म्हणतात. हा खेळ म्हणजे समृद्धीचे प्रतीक मानला जातो. गाणी म्हणताना मुली एकमेकांना ‘डबा वाजव’ हा खेळ खेळून कोणत्या डब्यात काय खाऊ आहे ते ओळखतात. अशा रीतीने हादगा हा मुलींना आनंद देणारा, एकत्र येण्याची संधी आणि परंपरा जपण्याचा मार्ग ठरतो.
advertisement
ज्यांच्या विवाहात अडथळे त्यांनी पिवळी वस्तू अर्पण करा, पुण्यात देवीची आख्यायिका, भाविकांची गर्दी
या शाळेत मुली एकत्र जमून रिंगण धरतात, हादग्याची पारंपरिक गाणी म्हणतात आणि फेर धरतात. एवढेच नाही तर मुली वेगवेगळ्या प्रकारचे प्रसाद आणतात आणि डब्यांमध्ये ठेवून ‘डबा वाजव’ या खेळातून एकमेकांना ओळख लावतात की कोणत्या डब्यात काय खाऊ आहे. अशा प्रकारे जुनी परंपरा आनंदात साजरी केली जाते.
या कार्यक्रमात शाळेचे सर्व शिक्षक उत्साहाने सहभागी होतात. ते मुलांना आपल्या पारंपरिक रूढी-परंपरा जपण्यासाठी प्रोत्साहन देतात तसेच हादग्याच्या खेळाचे महत्त्व आणि इतिहास समजावून सांगतात. “मुलांना जुन्या पिढीतील परंपरा समजल्या पाहिजेत. आमचा प्रयत्न आहे की त्या मुलांपर्यंत पोहोचाव्यात,” असं मुख्याध्यापक एम. आर. पाटील सांगतात.
“आपल्या परंपरांशी नाळ तुटली आहे, ती पुन्हा जपली पाहिजे. संस्कार शाळेतूनच रुजतात आणि म्हणूनच शिक्षक मंडळी मुलांना या परंपरा शिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात,” असे सहाय्यक शिक्षक अशोक पाटील सांगतात. अशा प्रकारे विद्यामंदिर सावे शाळा विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच आपल्या संस्कृतीशी जोडणारी महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहे.