TRENDING:

कोल्हापूरची अनोखी नाईट लाईफ, दररोज रात्री होते याठिकाणी गर्दी, कारणही आहे खास

Last Updated:

कोल्हापुरातील अनेक दूध कट्ट्यांवर कित्येक वर्षांपासून गवळी हे कोल्हापूरकरांना दूध पाजण्यासाठी आपल्या म्हशी घेऊन येतात. कोल्हापूरच्या शनिवार पेठेतील गवळी गल्लीमध्ये राहणारे भय्या गवळी हे त्यापैकीच एक आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
advertisement

कोल्हापूर : कुस्तीपंढरी म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापुरात अनेक पैलवान कसरत करुन आपली तब्येत बनवतात. कोल्हापुरातल्या लहान, थोर या अशा पैलवानांसाठी तब्येत वाढवण्यासाठीचे सगळ्यात महत्त्वाचे ठिकाण म्हणजे दूध कट्टा हे आहे. पहाटे आणि रात्रीच्या वेळी कोल्हापुरातील जागोजागी दूध काढणारे गवळी आणि ते म्हशीचे आकडी दूध येणारा दुधप्रेमी वर्ग, असे वातावरण रोज कोल्हापुरात पाहायला मिळत असते.

advertisement

रात्री 9 वाजल्यावर म्हैस मालक आपल्या म्हशी घेऊन कोल्हापूर शहरात दुधकट्ट्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या गंगावेश, पापाची तिकटी, महानगरपालिका परिसर, मिरजकर तिकटी, आदी ठिकाणी जायला निघतात. बरेचजण या म्हैस मालकांची वाट बघतच या ठिकाणी थांबलेले असतात. म्हशीचे ताजे आकडी दूध काढून प्रत्येकाला हे म्हैसमालक देत असतात. कोल्हापुरातील कितीतरी म्हशींचा मालक असणारा प्रत्येक गवळी यानिमित्ताने कोल्हापूरकरांची तब्येत वाढवण्यासाठीच हातभार लावत असतो.

advertisement

कोल्हापुरातील अनेक दूध कट्ट्यांवर कित्येक वर्षांपासून गवळी हे कोल्हापूरकरांना दूध पाजण्यासाठी आपल्या म्हशी घेऊन येतात. कोल्हापूरच्या शनिवार पेठेतील गवळी गल्लीमध्ये राहणारे भय्या गवळी हे त्यापैकीच एक आहेत. आपल्या दोन भावांसह आपल्या म्हशी घेऊन ते नियमित गंगावेश या ठिकाणी सकाळी आणि पापाची तिकटी येथे संध्याकाळी येत असतात. त्यांच्या स्वतःच्या जवळपास 20 हून जास्त म्हशी आहेत.

advertisement

मिरचीने आणली आयुष्याला गोडी, फक्त 30 गुंठ्यात लाखो रुपयांचं उत्पन्न, जालनाच्या शेतकऱ्याची कमाल!

त्यांच्या पणजोबांच्या काळापासून म्हणजे मागील 40 ते 50 वर्षांपासून ते हा व्यवसाय करत आहेत. डोळ्यांसमोरच ताजे दूध काढले जात असल्याने कोल्हापुरातील तरुण, सकाळी कामाला जाणारे व रात्री घरी जाणारे नागरिक, पैलवान तसेच बाहेरगावचे बरेचजण नियमित या ठिकाणी दूध पिण्यासाठी येत असतात. विना पाण्याचे तसेच विना प्रक्रिया केलेले हे ताजे दुध असते. 80 रुपये प्रति लीटर या दराने या दुधाची इथे विक्री होते. यासोबतच जर याठिकाणी दूध प्यायचे असेल तर एक ग्लास दुधाची किंमत 30 रुपये आहे. ताजे आकडी दुध पिणे शरीरासाठी फायदेशीर असल्याने दररोज 20 ते 25 लिटर दूध विक्री जागेवरच होत असते, अशी माहिती भैय्या गवळी यांनी दिली आहे.

advertisement

वडापाव अन् बर्गरचं अनोखं कॉम्बिनेशन, दादरमधील युनिक बडापाव स्टेशनची सर्वत्र चर्चा, हे आहे लोकेशन

रोज सकाळी आणि रात्री या दूध कट्ट्यावर जाऊन ताजे म्हशीचे दूध पिणे ही तर कोल्हापुरातल्या कित्येकांची वर्षानुवर्षांची परंपरा बनली आहे. या ताजे दुध पिण्याच्या सवयीमुळे कित्येक जण निरोगी जीवन जगत आहेत. कोल्हापुरातील लक्ष्मी ऑईल मिल प्रसिद्ध तेलाच्या दुकानाचे गंगावेश या ठिकाणी राहत असणारे मालक कृष्णात तवटे हेसुद्धा रोज नियमित दूध पिण्यासाठी या दूध कट्ट्यावर येतात. त्यांचे वय 70 वर्षे आहे. पण 1974 सालापासून ते न चुकता रोज रात्री इथे दूध पिण्यासाठी येतात. रोजच्या ताजे आकडी दूध पिण्याच्या सवयीमुळेच आज या वयातही मी तंदुरुस्त आहे, असे मत तवटे यांनी व्यक्त केले.

दरम्यान, बदलत्या काळानुसार कोल्हापुरातील या दूध कट्ट्यांचे स्वरूपही थोड्याफार प्रमाणात बदलले आहे. बाहेरच्या राज्यातून येऊन या ठिकाणी आपले शरीर कसणारे पैलवान या दुध कट्ट्यांवर सध्या कमी प्रमाणात येत असतात, अशी माहिती देखील दूध कट्ट्यावरील बऱ्याचशा गवळ्यांनी दिली आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
कोल्हापूरची अनोखी नाईट लाईफ, दररोज रात्री होते याठिकाणी गर्दी, कारणही आहे खास
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल