कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा इतिहास
आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, 2008 नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, कोरेगाव मतदारसंघात सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील पुसेगांव आणि खटाव ही महसूल मंडळे, कोरेगांव तालुक्यातील सातारा रोड, किन्हई, कुमठे आणि कोरेगांव ही महसूल मंडळे आणि सातारा तालुक्यातील बडुथ, खेड आणि तासगांव ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. हा सातारा लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. काँग्रेस नेते शंकरराव जगताप यांनी सर्वाधिक काळ या भागाचं प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर शालिनीताई पाटील कोरेगावमधून निवडून येत होत्या. आधी काँग्रेस आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला पहिला सुरुंग लागला गेल्या निवडणुकीत 2019 च्या निवडणुकीत महेश शिंदे शिवसेनेचेच्या तिकिटावर निवडून आले. त्यांनी माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांचा पराभव केला होता. आता याच दोन शिंदेंमध्ये यंदाही लढत होणार आहे. शशिकांत शिंदे यांचा गेल्या निवडणुकीत पराभव झाल्यावर त्यांना विधान परिषदेत संधी देण्यात आली. ते सध्या विधान परिषदेवर आमदार आहेत. त्यामुळे दोन आमदारांमधला सामना कोरेगावात रंगणार आहे.
advertisement
2019 विधानसभा निवडणुकीचा निकाल
महेश शिंदे –शिवसेना – 101,487
शशिकांत शिंदे – राष्ट्रवादी - 95,255
2019 ची विधानसभा लढतच 2024 मध्ये पुन्हा होणार आहे. फक्त फरक एवढाच की गेल्या निवडणुकीला शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष अखंड होते आणि आता दोन्ही पक्षांमध्ये उभी फूट पडलेली आहे.
2024 लोकसभा निवडणुकीत काय झालं?
साताऱ्यात या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी हाय प्रोफाईल उमेदवार होते. महायुतीने उदयनराजे भोसले यांना तिकिट दिलं होतं. तर महाविकास आघाडीने कोरेगावचे माजी आमदार शशिकांत शिंदे यांना रिंगणात उतरवलं होतं भाजपचे उदयनराजे यांनी निवडणुकीत बाजी मारली. त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शशिकांत शिंदे यांचा उदयनराजे यांना 5 लाख 71 हजार 134 मते मिळाली. त्यांनी शिंदे यांचा 32771 मतांच्या फरकाने पराभव केला. सातार लोकसभेवर यंदा पहिल्यांदाच भाजपाचा खासदार झाला आहे. त्यामुळे साताऱ्यातील भाजपाच्या वाट्याला येणाऱ्या विधानसभा मतदारसंघात विजय प्राप्त करण्याची जबाबदारी पक्षाने उदयनराजेंकडे दिली असल्याच्या बातम्या आहेत.
गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी शशिकांत शिंदे रिंगणात आहेत. ते कोरेगावचे दोन टर्म आमदार राहिले आहेत.
सातारा जिल्ह्यातील विद्यमान आमदार आणि त्यांची भूमिका
- सातारा जावळी- शिवेंद्रराजे भोसले- भाजप
- वाई - मकरंद पाटील – राष्ट्रवादी
- फलटण- दीपक चव्हाण – राष्ट्रवादी शरदचंद्र पवार
- माण खटाव- जयकुमार गोरे- भाजप
- कोरेगाव- महेश शिंदे- शिवसेना
- कराड उत्तर - बाळासाहेब पाटील – राष्ट्रवादी शरदचंद्र पवार
- कराड दक्षिण - पृथ्विराज चव्हाण - कॉंग्रेस
- पाटण - शंभुराजे देसाई – शिवसेना
-
