लालूंची अटलबिहारींवरही टीका, बाळासाहेबांनी झापलं
लालू प्रसाद यादव यांनी याआधीही तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर अशीच टीका केली होती, त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी खास त्यांच्याच शैलीत लालू प्रसाद यादव यांच्यावर घणाघाती पलटवार केला होता. 1998 च्या दसरा मेळाव्यातून भर सभेत बाळासाहेबांनी लालूना प्रत्युत्तर दिलं होतं. वाजपेयी हिंदू नाही, कारण त्यांचं लग्न झालं नाही त्यांना धर्माची हळद लागली नाही, या लालू प्रसाद यादव यांच्या वक्तव्याचा दाखला घेऊन बाळासाहेबांनी लालूंवर निशाणा साधला होता.
advertisement
काय म्हणाले होते बाळासाहेब?
'हिंदूची व्याख्या केली, हिंदू कशाला म्हणतात म्हणे. माझं लग्न झालं, आमच्या शरिराला हळद लागली, आम्ही हिंदू आहोत. ज्याच्या अंगाला लग्न झाल्यामुले हळद लागेल तो हिंदू. हे आपल्याला पटत नाही. लग्नाची हळद ज्याच्या अंगाला लागते तो हिंदू असं जर असेल तर मुसलमानाचं नेतृत्व करण्याकरता त्या माणसाची सुंता व्हायलाच पाहिजे. ज्याची सुंता नाही तो नेतृत्व करू शकत नाही. बिन सुंत्याचा चालेल का मुसलमानांना जाऊन विचारा. सुत्यांवर नेतृत्व अवलंबून नाही ना, तुमचं नाही तर हळदीचाही प्रश्न नाही. ते का म्हणाले तर वाजपेयी हिंदू नाही, कारण त्यांचं लग्न झालं नाही म्हणून. काय शोध लावला? मग आम्हीही सुंतेचा शोध लावला. ज्याची सुंता झाली नाही, तो मुसलमानांचं नेतृत्व करू शकत नाही, चालेल? हे जसं चालत नाही, तसा हळदीचा आणि लग्नाचा काही संबंध नाही. लग्न झाल्यावर पिवळी होत असेल ती गोष्ट निराळी,' अशा शब्दांमध्ये बाळासाहेबांनी लालू प्रसाद यादवना शिवतिर्थावरून सुनावलं होतं.