जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती
रात्री आठची वेळ... सोसाट्याचा वारा आणि पावसाचा आवाज वातावरणात भीती निर्माण करत होता. काही कळायच्या आतच पाण्याच्या प्रचंड लोंढ्याने रिक्षाला वेढले आणि क्षणात ती वाहून गेली. रिक्षातील इतर प्रवासी कुठे गेले, याचा थांगपत्ताही लागला नाही. मात्र, पाण्याच्या प्रवाहात फेकल्या गेलेल्या विठ्ठल गवळे यांनी जीवाची आकांताने एका करंजीच्या झाडाला घट्ट पकडले. अंगावरचे कपडे फाटले होते, शरीर थकून गेले होते, पण जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती त्यांना बळ देत होती.
advertisement
"मला वाचवा... मला वाचवा!"
पुढचे तब्बल तीन तास काळोख्या अंधारात, खाली वेगाने वाहणारं पाणी आणि वर मृत्यूची भीती अशा स्थितीत ते झाडावर बसून होते. प्रत्येक क्षण त्यांना पाणी आपल्याला गिळंकृत करेल की काय, असे वाटत होते. आशेचा प्रत्येक किरण मावळला असताना, अचानक त्यांना काही लोकांचा आवाज ऐकू आला. सुरुवातीला विश्वासच बसला नाही, पण जेव्हा तो आवाज स्पष्ट झाला, तेव्हा त्यांच्या जीवात जीव आला. त्यांनी मदतीसाठी जोरजोरात आरोळी ठोकली, "मला वाचवा... मला वाचवा!"
रात्रीचा थरार आणि माणुसकीचे महत्त्व
त्यांची हाक ऐकून स्थानिक नागरिक आणि एनडीआरएफचे बचाव पथक देवदूतासारखे धावून आले. त्यांनी दोरीच्या साहाय्याने विठ्ठल यांना मृत्यूच्या जबड्यातून बाहेर काढले. किनाऱ्यावर आल्यावर त्यांची अवस्था अत्यंत बिकट होती. हे पाहून तहसीलदार राजेश लांडगे यांनी माणुसकी दाखवत त्यांना स्वतःच्या गाडीतून घरी पोहोचवले. "समोर मृत्यू दिसत होता, पण एका झाडाने आणि माणसांनी मला वाचवले," ही त्यांची प्रतिक्रिया त्या रात्रीचा थरार आणि माणुसकीचे महत्त्व सांगून जाते. दरम्यान, याच घटनेतील शान उर्फ संगीता सूर्यवंशी, वैभव गाडकवाड आणि सुदर्शन घोणशेट्टे यांचा शोध अद्याप सुरू आहे.
हे ही वाचा : Disha Patani: 2 महागडी घरं ते 6 लग्झरी गाड्या; बोल्डनेस क्वीन दिशा पाटनी आहे इतक्या कोटींची मालकीण!
हे ही वाचा : दारूची झिंग चढली अन् पेटला वाद, दोघांनी मित्रावर झाडल्या 3 गोळ्या, भरदुपारी 'त्या' शेतात नेमकं काय घडलं?